Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाला त्यावेळी चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलीवूडचे नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य उपस्थित होते. बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक संघर्ष आणि आयुष्यातील कठीण निर्णयांची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि संकलन निलेश भास्कर नाईक यांचे असून, निर्मिती विदुला रमेश आजगावकर यांनी केली आहे. ‘द्विधा’ चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


‘द्विधा’ हा बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, जबाबदारी, त्याग आणि भावनिक द्वंद्व यांची मनाला भिडणारी कथा आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या वळणावर उभी असलेली मुलगी आणि तिच्या वडिलांमधील नात्याचे भावनिक पदर चित्रपटातून उलगडले जातात. नात्यांमधील संघर्ष, माणुसकी आणि भावनिक निर्णयांचा हा प्रवास प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा ठरणार आहे.


‘द्विधा’ माझ्यासाठी खूप खास अनुभव आहे. बाप-लेकीचं नातं वरकरणी साधं वाटत असलं, तरी त्यामागे अव्यक्त भाव, प्रेम आणि संघर्ष दडलेले असतात. माझ्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून हे भावविश्व अनुभवताना मला स्वतःलाही अनेक गोष्टी नव्याने जाणवल्या. ट्रेलरमध्ये या नात्याची केवळ एक झलक पाहायला मिळते; मात्र संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर या नात्याची खोली प्रेक्षकांना अधिक जाणवेल. ‘द्विधा’ची कथा प्रत्येकाच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा मला विश्वास आहे’; असे चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मानसी कुलकर्णी म्हणाल्या.



‘बाप-लेकीचं नातं हे अत्यंत हळवं आणि भावनिक असतं. ‘द्विधा’मध्ये एका वडिलांच्या मनातील आपल्या मुलीविषयीचं प्रेम, काळजी, जबाबदारी आणि तिच्या निर्णयांबद्दलची अस्वस्थता साकारताना एक वेगळाच अनुभव मिळाला. या व्यक्तिरेखेतील भावना अतिशय सूक्ष्म पद्धतीने मांडल्या आहेत. ट्रेलर अनावरणाच्या निमित्ताने या कथेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर येत आहे, याचा आनंद आहे, असे ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर म्हणाले.


‘द्विधा’ चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत रेणुका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


चित्रपटातील गीतांना मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर यांचे शब्द लाभले असून, निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. हंसिका परीक आणि मयुरी पटवर्धन यांच्या स्वरांनी गीते अधिक भावपूर्ण झाली आहेत. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट आणि श्रीधर अल्ले यांचे असून, वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर यांची, तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे आणि आकाश स्वजन सेनगुप्ता यांचे आहे.

Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी