कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Junction railway station) येथे घडलेला एक अनोखा प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. मे महिन्याच्या अखेरीस वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असताना, एका प्रवाशाने कल्याण रेल्वे स्थानकावरील पाणपोईच्या नळाखाली थेट आंघोळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने प्रवाशांसह नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रियांचा पूर आला आहे.
प्लॅटफॉर्मवरच ‘शॉवर’चा आनंद :
Cannes Film Festival : सध्या सोशल मीडियावर बहुप्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरु आहे. कान्स फेस्टिव्हल हा केवळ चित्रपटांपुरता मर्यादित नसून तो ...
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस :
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. “कल्याणचा उन्हाळा म्हणजे थेट भट्टी!”, “रेल्वेने मोफत शॉवर सेवा सुरू केली का?”, “स्विमिंग पूल परवडत नसेल तर पाणपोईच बरी!” अशा मजेशीर कमेंट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काहींनी या प्रकाराकडे विनोदी नजरेतून पाहिले, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे आंघोळ करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. (Kalyan Junction railway station)
नवी मुंबई : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी कंबर कसली आहे. ...
उष्णतेने नागरिक त्रस्त :
रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया :
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनानेही दखल घेतली आहे. रेल्वे सूत्रांनी सांगितले की, स्थानकांवरील पाणपोई या प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आहेत. त्याचा अशा प्रकारे गैरवापर करणे चुकीचे असून सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करणे नियमबाह्य आहे. (Kalyan Junction railway station)
मंत्री नितेश राणे; मच्छिमारांच्या हिताला बाधा न पोहोचवता कोकण किनारपट्टीचा जागतिक विकास करणार मुंबई (सुहास शेलार) : जागतिक जहाजबांधणी आणि सागरी ...






