पाऊस आठवडाभर लांबणार; धरणांमध्ये १० हजार ४२१.९० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा
मुंबई : मान्सूनने राज्यातील काही भागांत प्रवेश केला असला तरी सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आणखी किमान आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटून अवघ्या २५.५१ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ३०.५३ टक्के होता. विशेषतः पुणे विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा १५.५४ टक्क्यांपर्यंत घसरल्याने घरगुती पाणीपुरवठा, शेती आणि उद्योगांसाठीच्या नियोजनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण ३ हजार २८ धरणांमध्ये सध्या १० हजार ४२१.९० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या १० जून २०२६ रोजीच्या अहवालातून समोर आली आहे. राज्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठ्यांवरील ताण वाढू लागला आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागात सर्वाधिक ३८.४० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून नागपूर विभागात ३६.९८ टक्के साठा आहे. कोकण विभागात ३१.२६ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात २८.१७ टक्के आणि नाशिक विभागात २६.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, पुणे विभागातील स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून तेथील धरणांमध्ये केवळ १५.५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Simhastha Kumbh Mela 2027) दरम्यान अमृत पर्वणीच्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना ‘नो एंट्री’ लागू करण्यात येणार ...
गेल्या वर्षी याच दिवशी पुणे विभागातील धरणांमध्ये २६.८२ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा तब्बल ११ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. पुणे विभागातील ७२४ धरणांमध्ये सध्या २ हजार ३७०.२७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर, नीरा देवघर, डिंभे, मुळशी, कोयना आणि वारणा यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमधील साठाही अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील अनेक धरणांमधील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाने मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याचे संकेत दिले असले, तरी प्रत्यक्षात व्यापक आणि मुसळधार पाऊस होईपर्यंत जलसाठ्यांवरील दबाव कायम राहणार आहे. विशेषतः पावसाने आणखी ओढ दिल्यास पुणे विभागासह राज्यातील काही भागांतील पाणीपुरवठ्यासमोर गंभीर आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
trains cancelled : मध्य रेल्वे प्रशासनाकडून (Central Railway Administration) पुणे यार्डात पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासह सिग्नलिंग यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण ...
- अमरावती : ३८.४०
- नागपूर : ३६.९८
- कोकण : ३१.२६
- छत्रपती संभाजीनगर : २८.१७
- नाशिक : २६.६६
- पुणे : १५.५४
राज्याचा एकूण पाणीसाठा : २५.५१ टक्के गेल्या वर्षी याच दिवशी : ३०.५३ टक्के





