Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताचे झपाट्याने होणारे तांत्रिक परिवर्तन, लोकशाही की लवचिकता आणि वाढता जागतिक प्रभाव यावर विशेष भर दिला. त्याचबरोबर सध्याचे दशक अनिश्चितता आणि जागतिक संकटाचे राहिले आहे. त्यांनी कोविड-१९ महामारी आणि सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धांचा जगासमोरील मोठी आव्हाने म्हणून उल्लेख केला. हे दशक जगासाठी आव्हानांचे दशक बनत चालले आहे," असे ते म्हणाले. त्याचवेळी, पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की, भारत हा तांत्रिक प्रगती आणि मानवी मूल्यांच्या बळावर पुढे जाणारा एक संधींचा देश आहे. मोदी म्हणाले, "भारत हा संधींचा देश आहे. भारत तंत्रज्ञानाने प्रेरित आहे आणि तितकाच तो मानवतेने प्रेरित देखील आहे. आजचा भारत एका अभूतपूर्व परिवर्तनाच्या काळातून जात आहे. भारतात आकांक्षा अमर्याद आहेत, म्हणूनच आमचे प्रयत्न देखील अथांग होत आहेत.



भारताच्या लोकशाही रचनेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, "भारत आपल्या प्रत्येक नागरिकाच्या लोकशाहीतील सहभागाला अत्यंत मोलाचे मानतो. लोकशाहीची जननी म्हणून हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. भारत आणि नेदरलँड्स हे दोन्ही देश विश्वासार्ह आणि पारदर्शक जागतिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. तंत्रज्ञान, व्यापार यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक प्रकल्पांपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश सहकार्य अधिक दृढ करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



अनिवासी भारतीयांच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या समुदायाने भारताशी असलेले आपले मजबूत सांस्कृतिक संबंध जपले आहेत. आपल्या कर्तृत्वाने व व्यावसायिक यशामुळे परदेशात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "द हेगमधील भारतीय समुदायाशी संवाद साधताना अत्यंत आनंद झाला. त्यांची आपुलकी, यश आणि भारतासोबत असलेले घट्ट नाते आपल्या सर्वांसाठी सतत अभिमानास्पद ठरत आहे."



भारतीय संस्कृतीच्या शाश्वत स्वरूपावर भर देताना मोदी म्हणाले की, शतकानुशतके जागतिक बदल होऊनभी भारताची सांस्कृतिक ओळख नेहमीच जिवंत राहिली आहे. ते म्हणाले, काळाच्या ओघात अनेक संस्कृती नष्ट झाल्या. परंतु, भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आजही इथल्या लोकांच्या हृदयात तितक्याच ताकदीने धडधडत आहे. भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश सेमीकंडक्टर निर्मिती आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे. भारतभरात सध्या १२ सेमीकंडक्टर प्लांट्सवर काम वेगाने सुरू असून, दोन प्लांटमध्ये उत्पादन देखील सुरू झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मोदी म्हणाले, "याचा अर्थ असा की आता चिप्स भारतात 'डिझाइन'ही केल्या जातील आणि 'मेड इन इंडिया' देखील असतील."


भारतात स्टार्टअपचे मोठे नेटवर्क : भारतातील स्टार्टअप्सच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताचे स्टार्टअप नेटवर्क जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क बनले आहे. भारत स्टार्टअप्स एआय , संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत," असे सांगून त्यांनी स्पष्ट केले की भारताची ही नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था जागतिक सहकार्यासाठी नवीन संधी निर्माण करत आहे.


नेदरलँड महत्त्वाचा आर्थिक भागीदार : भारत तंत्रज्ञान, व्यापार, हवामान सहकार्य, सेमीकंडक्टर आणि धोरणात्मक पुरवठा साखळी यांसारख्या क्षेत्रांमध्ये नेदरलँड्ससह युरोपीय देशांसोबतचे संबंध मजबूत करत असतानाच पंतप्रधानांचे हे वक्तव्य आले आहे. युरोपीय युनियनमध्ये नेदरलँड्स हा भारताचा एक महत्त्वाचा आर्थिक भागीदार म्हणून समोर आला आहे. नेदरलँड्समधील भारतीय समुदायाची लोकसंख्या २ लाखांपेक्षा जास्त असून, या समुदायाने दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

Comments
Add Comment

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही

Foreign Journalists in Pakistan : POK मधील सत्य लपवण्याचा प्रयत्न? पाकिस्तानने परदेशी पत्रकारांसाठी लागू केले नवे नियम

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मधील आंदोलनांवर करण्यात आलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर

Dubai Explosion : दुबई हादरली! जेबेल अली अन् पाम जुमेराहजवळ भीषण स्फोट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात

Yemen attack : येमेनजवळ भारतीय मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 13 भारतीयांसह सर्व 14 खलाशी सुखरूप

येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र