Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने भारतीय सीमेवर चीननिर्मित एसएच-१५ (SH 15) स्वयंचलित तोफा मोठ्या संख्येने तैनात करण्यास सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्याने तोफांची संख्या वाढवली जात आहे.



दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना एक पत्रकाराने चिनी तोफांबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना दहशतवादाला विरोधी हीच भारताची अधिकृत भूमिका आहे आणि ती कायम असल्याचे सांगितले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तर जगाने बघितले आहे. राष्ट्रहितासाठी जे आवश्यक असेल ते केले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.



पाकिस्तान - भारत सीमेवर पाकिस्तानने २५० चिनी तोफा तैनात केल्याचे वृत्त आले. यानंतर राष्ट्रहितासाठी जे आवश्यक असेल ते केले जाईल, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली.



चिनी बनावटीच्या एसएच-१५ (SH 15) स्वयंचलित तोफा चाकांच्या मदतीने वेगाने हालचाल करणाऱ्या हॉवित्झर प्रकारातील आहेत. या तोफा सीमेवर तैनात केल्यानंतर सशस्त्र जवानांच्या कडक पहाऱ्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. ही प्रक्रिया राबवताना दडपशाही, लाठीमार, गोळीबार असे प्रकार घडले. यात अनेकांचा मृत्यू झाला. पाकिस्तान सरकारने निवडणूक प्रक्रिया राबवतात माहिती देण्यापेक्षा लपवण्यावर जास्त भर दिला. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करून मतदारांवर दडपण आणण्याचे प्रकारही घडले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील निवडणूक म्हणजे निव्वळ नाटक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. विशेष म्हणजे पाकिस्तान सरकारनेच पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये लोकशाहीची हत्या केली अशा स्वरुपाच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने परदेशी प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनावर कठोर निर्बंध घातले आहेत. परदेशी पत्रकारांना इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीबाहेर प्रवास करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची सक्ती लागू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

Donald Trump : ट्रम्प प्रशासनाकडून इराणला मदत करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर निर्बंध

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा