NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या अनुक्रमे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदांवर पूर्ण अधिकारांसह कायम आहेत, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात या दोन्ही नेत्यांच्या मुख्य पदांचा उल्लेख नव्हता, ती केवळ एक 'कारकून चूक' होती. या संदर्भात निवडणूक आयोगाला लवकरच एक नवीन पत्र पाठवून पटेल आणि तटकरे यांच्यासह पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांची स्पष्ट माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.



२९ एप्रिल रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. या पत्रातील नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची मुख्य पदे गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. पत्रात प्रफुल पटेल यांचा उल्लेख 'राज्यसभेचे पक्षनेते' आणि सुनील तटकरे यांचा उल्लेख 'लोकसभेचे पक्षनेते' असा करण्यात आला होता. परंतु, त्यांच्या नावांसमोर 'राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष' आणि 'महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष' या त्यांच्या मूळ संघटनात्मक पदांचा उल्लेख नसल्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांना पक्षात बाजूला केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. माध्यमांमधील वृत्तांचे खंडन करताना उमेश पाटील म्हणाले, "प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची पदे आधीसारखीच कायम आहेत. निवडणूक आयोगाकडे गेलेल्या पत्रात केवळ तांत्रिक चूक झाली होती, ज्याचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढला. उमेश पाटील यांनी आवाहन केले की, माध्यमांमध्ये चालणाऱ्या परस्परविरोधी आणि नकारात्मक बातम्या पूर्णपणे आधारहीन असून या चर्चा आता थांबवल्या जाव्यात. "दिवंगत अजित दादांच्या निधनानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार पार्थ दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पुढे जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.



दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन घेणार : पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार लवकरच दिल्लीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावणार आहेत. पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदाधिकारी आणि प्रशासकीय नियुक्त्यांचे वेळापत्रक या अधिवेशनात अंतिम केले जाईल. सध्या निवडणूक आयोगाशी केलेला पत्रव्यवहार हा केवळ कायदेशीर प्रक्रिया, प्रशासकीय संवाद आणि पक्षांतर्गत तात्पुरत्या सोयीसाठी करण्यात आला होता. यात आवश्यक ते बदल किंवा सुधारणा करण्याचा अंतिम अधिकार राष्ट्रीय अध्यक्षांना आहे. जोपर्यंत पक्षाची विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणी आणि सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नवीन निवडणूक होत नाही, तोपर्यंत सर्व वर्तमान प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जुन्या व्यवस्थेनुसारच काम पाहत राहतील. "आम्ही लवकरच निवडणूक आयोगाला नवीन सुधारित पत्र पाठवत आहोत. यामध्ये आमच्या ज्येष्ठ नेत्यांची पदे स्पष्ट केली जातीलच, सोबतच पक्षाने निश्चित केलेल्या काही नवीन अंतर्गत संघटनात्मक नियुक्त्यांची माहितीही जोडली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.


दिल्ली कार्यालयात प्रवेशबंदीच्या अफवांचे खंडन : पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याच्या बातम्यांचे जोरदार खंडन केले. दिल्ली कार्यालयातील जुनीच व्यवस्था पुढेही लागू राहील, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की पक्ष पूर्णपणे एकसंध असून आगामी राजकीय रणनीतीवर लक्ष केंद्रित करत आहे.

Comments
Add Comment

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी