मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेली ११ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून नवीन कारागृह उभारण्यासाठी मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत जमिनीचा आगाऊ ताबा अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह यांना देण्यात आला.
मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी आणि तपास यंत्रणांना नवी दिशा देण्यासाठी गृह विभागाने शुक्रवारी वरिष्ठ पोलीस ...
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. केवळ एका दिवसात १२०० पेक्षा अधिक झोपड्या हटवून प्रशासनाने ११ एकर जागा मोकळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील गट क्रमांक १/२ मधील ही जमीन कारागृहासाठी देण्याचे निर्देश देण्यात आले होते.मुंबईच्या सुरक्षेच्या आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून मानखुर्दचा शासकीय भूखंड कारागृहासाठी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होता. या निर्णयाची अंमलबजावणी झाली असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.





