Nida Khan case Matin Patel : निदा खान प्रकरणात MIM नगरसेवक अडचणीत! मतीन पटेलांच्या घर-कार्यालयावर महापालिकेचा बुलडोझरचा इशारा

नाशिकमधील चर्चित टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान (Nida Khan) हिला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मतीन पटेल (Matin Patel) यांना आरोपी केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर महापालिकाही आक्रमक झाली असून त्यांच्या घरासह कार्यालयावर कारवाईची तयारी सुरू केली आहे.


महापालिकेच्या प्राथमिक तपासात निदा खान ज्या घरात राहत होती ते बांधकाम बेकायदेशीर अतिक्रमण करून उभारण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर संबंधित घराला नोटीस बजावण्यात आली असून तीन दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करून बांधकाम पाडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नारेगाव परिसरातील मतीन पटेल यांचे दुसरे राहते घर आणि त्यांच्या कार्यालयालाही अतिक्रमणाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यास होती. ती एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर शहरात दाखल झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी नारेगावमधील कौसर पार्क परिसरात मतीन पटेल यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये तिला ठेवण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.


नाशिक पोलिसांच्या तपासात निदा खानला लपवून ठेवण्यासाठी मतीन पटेल यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षांकडून एमआयएमवर जोरदार टीका केली जात असताना, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली.



ओवैसी यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “आजपर्यंत किती आमदार-खासदारांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत? निदा खानला एमआयएम नगरसेवकाने लपवले, हे नेमके कशावरून ठरवण्यात आले?” असा सवाल केला. तसेच व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे शिक्षा होऊ शकते का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले की, “टीसीएसचे अधिकृत स्टेटमेंट सर्वांनी पाहिले आहे. निदा खानचा एचआर विभागाशी कोणताही संबंध नव्हता. एफआयआर दाखल होण्यापूर्वीच तिची बदली करण्यात आली होती. काही माध्यमांकडून या प्रकरणात मीडिया ट्रायल सुरू असून आम्ही त्याचा निषेध करतो.” ते पुढे म्हणाले, “बुरखा घालणं कधीपासून बेकायदेशीर झालं? आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. निदा खानवरील आरोप न्यायालयात टिकणार नाहीत. केवळ द्वेषापोटी आरोप केले जात आहेत. आरोप झाले म्हणजे शिक्षा झाली असे नाही. एमआयएमला टार्गेट केलं जात असलं तरी आम्ही घाबरणार नाही,” असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Prithviraj Chavan : २०१४ मध्येच होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना मुंबई :

Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण-बालेवाडी मेट्रोला सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाअभावी सेवा रखडली

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pune) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या

Gold Silver Rate Today : बाईई...सोन्या-चांदीचा भडका! २४ तासांत दर उच्चांकी पातळीवर; पाहा आजचे ताजे भाव!

जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत

Pune News : पुणे रेल्वे यार्डात 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून पुणे यार्डातील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले

Beed News : पुण्यात खळबळ! बीडचा नामांकित राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीडचा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात प्रचंड उलटफेर! आज तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की ऊन पडणार? जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला असून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप