Prithviraj Chavan : २०१४ मध्येच होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना


मुंबई : "डिसेंबर २०१४ मध्येच तत्कालीन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन 'महाविकास आघाडी'च्या धर्तीवर सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र हा प्रस्ताव आपण स्वतः तिथल्या तिथे फेटाळला होता", असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला. (Prithviraj Chavan)


माध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला बाजूला ठेवून सरकार स्थापन करण्याचा हा प्रस्ताव होता. मात्र, त्यावेळी आपल्या पक्षाला शिवसेनेसोबत जाणे मान्य होणे शक्य नव्हते, त्यामुळे आपण तो प्रस्ताव स्वीकारला नाही. पुढे २०१९ मध्ये मात्र ही परिस्थिती बदलली आणि आपणच मविआचा प्रस्ताव पुढे केला, असे त्यांनी सांगितले. (Prithviraj Chavan)


दरम्यान, आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या कुंभमेळ्यात ३ ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला होता, मग आता ३५ हजार कोटींचे बजेट कसे काढले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकल्पाचा कोणताही वैज्ञानिक अभ्यास किंवा 'प्रोजेक्ट रिपोर्ट' तयार करण्यात आलेला नाही. ६ कोटी लोक येतील असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात येणाऱ्या लोकांचा भार गोदावरी नदी आणि पर्यावरणाला झेलेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून, कंत्राटदारांचे लांगूलचालन करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. (Prithviraj Chavan)

Comments
Add Comment

Amit Satam : 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' काँग्रेसला कधीही स्वीकारणार नाही!

- अमित साटम; देशविरोधी शक्तींकडून पैसे घेऊन अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव मुंबई : देशातील तरुण वर्ग अर्थात

Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण-बालेवाडी मेट्रोला सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाअभावी सेवा रखडली

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pune) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या

Gold Silver Rate Today : बाईई...सोन्या-चांदीचा भडका! २४ तासांत दर उच्चांकी पातळीवर; पाहा आजचे ताजे भाव!

जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत

Pune News : पुणे रेल्वे यार्डात 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून पुणे यार्डातील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले

Beed News : पुण्यात खळबळ! बीडचा नामांकित राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीडचा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात प्रचंड उलटफेर! आज तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की ऊन पडणार? जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला असून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप