जयपूर: आयपीएल २०२६ मध्ये गुजरात आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या लढतीत जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर वैभव सूर्यवंशीने नवा विक्रम केला. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने ५१४ चेंडूत १०० षटकार मारले. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फक्त ५१४ चेंडूत १०० षटकार मारण्याची किमया एकट्या वैभवने केली आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या कायरॉन पोलार्डच्या नावावर होता. पोलार्डने ८४३ चेंडूंमध्ये १०० षटकार मारले होते.
वैभव सूर्यवंशी हा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात लहान वयाचा तसेच सर्वात कमी चेंडूत १०० षटकार मारण्याची किमया साधणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याचे वय १५ वर्षे, ४३ दिवस आहे. त्याने शनिवार ९ मे २०२६ रोजी ५१४ चेंडूत १०० षटकार मारत नव्या विक्रमाची नोंद केली.
वैभवने एप्रिल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १०३ धावांची खेळी करताना, त्याने १२ षटकारांसह एकाच आयपीएल डावात भारतीयांकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ५० षटकार केवळ १५ डावांमध्ये पूर्ण केले , जे ख्रिस गेलच्या आधीच्या विक्रमापेक्षा सहाने कमी आहे. सूर्यवंशीने केवळ १७ आयपीएल डावांमध्ये ६१ षटकार ठोकले असून , त्याची सरासरी जवळपास प्रत्येक ४.८ चेंडूंमागे एक षटकार आहे.
IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५२ वा सामना आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे. दुखापतीमुळे या सामन्यातून राजस्थानने कर्णधार रियान परागलाच वगळले आहे. ...
वैभव सूर्यवंशी यंदाच्या हंगामात चांगल्या लयीत दिसत आहे . त्याने राजस्थानसाठी या हंगामात १० सामन्यांत २३७ च्या स्ट्राईक रेटने ४०४ धावा केल्या आहेत. तो राजस्थानसाठी या हंगामात सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे. विशेष म्हणजे, त्याने ३५० पेक्षा अधिक धावा फक्त चौकार आणि षटकाराच्या जोरावर केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्स आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधून जवळपास बाहेर झाली आहे. दिल्लीचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. हे तिन्ही सामने जिंकले तरी दिल्लीचे १४ गुण ...
आयपीएलमध्ये वैभवची कामगिरी
वैभव सूर्यवंशीने गेल्या हंगामात १९ एप्रिल २०२५ ला लखनऊ विरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १७ सामने खेळले आहेत. आयपीएलच्या १७ सामन्यात त्याने ६५६ धावा केल्या आहेत यात २ शतकं आणि तीन अर्धशतकांचाही समावेश आहे. वैभवने आयपीएलच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारले आहेत. याआधी हा विक्रम मुरली विजयच्या नावावर होता. त्याने आयपीएलच्या अवघ्या १५ डावात ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. तो आयपीएल इतिहासात सर्वात जलद ५०० धावा करणारा फलंदाज आहे.
आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक मारणाऱ्या खेळाडूंमध्ये वैभवचा समावेश आहे. त्याने आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. त्याच्या पुढे फक्त ख्रिस गेल आहे. वैभवची आयपीएलमधील ही कामगिरी बघता लवकरच त्याचा भारताच्या टी २० संघासाठी विचार होण्याची शक्यता आहे.




