जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत सोन्याच्या किमतीत (Gold Silver Rate Today) तब्बल २५०० रुपयांची वाढ झाली असून, गुरुवारी १५६००० रुपये प्रति १० ग्रॅम असलेला दर शुक्रवारी (२१ ऑगस्ट) १५८५०० रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, चांदीच्या दरात ८००० रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली; त्यामुळे काल २४०००० रुपयांवर असणारी चांदी आज २४८००० रुपये प्रति किलोग्रामवर गेली आहे. हे दोन्ही भाव जीएसटी व्यतिरिक्त आहेत.
बेळगाव : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तुरुंगातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने कैद्याकडून 40 हजार ...
जागतिक स्तरावरही परिस्थिती वेगळी नाही. जागतिक बाजारातील तेजीमुळे देशांतर्गत २४ कॅरेट सोन्याचे दर एकाच दिवसात ४३०० रुपयांनी वाढून १,६२,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर गेले आहेत. सोन्याचा हा गेल्या ३ महिन्यांतील सर्वोच्च स्तर असून यापूर्वी २६ मे रोजी असाच उच्चांक (१,६२,४०० रुपये) पाहायला मिळाला होता. तर शुद्ध चांदीच्या दरात थेट १०००० रुपयांची तुफान वाढ नोंदवली गेली असून भाव २,३५,००० रुपयांवरून थेट २,४५,००० रुपये प्रति किलोग्रामवर गेले आहेत, जो गेल्या ७ आठवड्यांतील उच्चांक मानला जात आहे.
या अचानक झालेल्या दरवाढीमागे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत. अमेरिकन डॉलर इंडेक्स आणि बाँड यील्डमध्ये झालेली मोठी घसरण, तसेच अमेरिकन फेडरल बँक व्याजदरात वाढ करणार नाही या संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीत मोठी गुंतवणूक सुरू केली आहे. याशिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर जाहीर केलेल्या नवीन आर्थिक निर्बंधांनंतर कच्च्या तेलाच्या किमती २ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचे दर ४,४५० डॉलर प्रति औंसच्या आसपास पोहोचले असून त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारातील सोन्या-चांदीच्या भावावर दिसून येत आहे.