मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट कामांबद्दल आयएसओ (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅडर्डायझेशन) नामांकन मिळाले. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क विभागाने हे यश मिळविले आहे. जनसंपर्क विभागामध्ये महाराष्ट्रात आयएसओ नामांकन मिळविणारा महापारेषणचा जनसंपर्क विभाग पहिलाच ठरला आहे.
जयपूर: आयपीएल २०२६ मध्ये आज गुजरात आणि राजस्थान यांच्यात लढत होणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला ...
महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत अनेक अभिनव उपक्रम राबविले आहेत. ‘महापारेषण समाचार’ या गृहमासिकेमध्ये क्यू-आर कोड, पॉडकास्ट आणि डिजिटल संवाद तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती सादरीकरणाला आधुनिक रूप दिले. जाहिराती आणि जनजागृती मोहिमांमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणारा हा विभाग राज्यातील अग्रगण्य विभाग म्हणून ओळखला जातो.विशेष म्हणजे, जनसंपर्क क्षेत्रात तब्बल १५ पुरस्कार पटकाविण्याचा विक्रमही महापार






