Friday, May 8, 2026

Navnath Ban : “लोकशाही नव्हे, उबाठा गटच आहे अखेरच्या टप्प्यात”; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Navnath Ban : “लोकशाही नव्हे, उबाठा गटच आहे अखेरच्या टप्प्यात”; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबई : पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे अभिनंदन केल्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार टीका केली आहे. “भारताची लोकशाही नव्हे, तर उबाठा गटच अखेरचा श्वास घेत आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आज म्हणजेच शुक्रवार ८ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अभिनंदन करायला हवे होते. कारण त्यांना स्वतःचे आमदार सांभाळता आले नाहीत आणि निवडणुकांमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला. आपल्या पक्षाची अवस्था काय झाली आहे, याचा आधी विचार करा आणि मग इतरांवर प्रश्न उपस्थित करा.”

तामिळनाडूमधील सत्तास्थापनेच्या चर्चांवर भाष्य करताना बन म्हणाले की, राज्यपालांना कोणाला शपथविधीसाठी बोलवायचे याचा अधिकार आहे. “जो पक्ष किंवा आघाडी बहुमत सिद्ध करेल, त्यालाच संधी दिली जाईल. लोकभावनेचा आदर राखूनच निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी उबाठा गटावर निशाणा साधत म्हटले की, “मुख्यमंत्रीपद गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट अस्वस्थ झाला आहे. जर तामिळनाडूतही त्यांना संधी हवी असेल, तर संजय राऊत यांनी समर्थनाचे पत्र घेऊन राजभवनात जावे,” असा टोला त्यांनी लगावला.

माजी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलेल्या शपथविधीच्या संधीचाही त्यांनी उल्लेख केला. “त्या वेळी भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून नव्हे, तर अजित पवार यांनी दिलेल्या समर्थनपत्राच्या आधारे संधी मिळाली होती,” असे बन म्हणाले.

काँग्रेससोबतच्या आघाडीवरूनही त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली. “भाजपासोबत असताना सन्मान आणि स्वाभिमान होता. मात्र काँग्रेससोबत गेल्यानंतर उबाठा गटाची अवस्था बिकट झाली आहे. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उबाठा गटाला कमकुवत करण्याचे काम केले,” असा आरोप नवनाथ बन यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >