Nashik TCS Case : निदा खानचे मेडिकल रिपोर्ट समोर, निदा गर्भवती ? महत्त्वाची माहिती उघड

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान (Nida Khan) अखेर पोलिसांच्या ताब्यात आली आहे. नाशिक (Nashik) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलिसांनी राबवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि वेगवान मोहिमेत निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या.


दरम्यान, धर्मांतर आणि लौंगिक शोषण प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या निदा खानबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. निदा खान ही दोन महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची UPT (युरिन प्रेग्नंसी टेस्ट) करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या टेस्टमध्ये निदा खान दोन महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून निदा खानबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे.



टीसीएस (TCS) प्रकरण उघड झाल्यानंतर निदा खानने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला होता. गर्भवती असल्याचं कारण देत तिने पुन्हा एकदा जमिनासाठी प्रयत्न केला होता, मात्र तिला अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर तिला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


या प्रकरणातील चार आरोपी रजा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसैन शौकत कुरेशी यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. परंतु या प्रकरणाची मास्टरमाईंड असलेली निदा खान मात्र फरार झाली होती. ती अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर तिला आता छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गु्न्हे शाखेच्या पोलिसांकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. थोड्याच वेळात पोलीस तिला न्यायालयात हजर करणार आहेत.




दरम्यान, निदा खान प्रकरणात आता मोठी राजकीय आणि कायदेशीर घडामोड समोर आली आहे. एआयएमआयएमचे नेते आणि माजी खासदार Imtiaz Jaleel यांच्या निवासस्थानी पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबींची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक जलील यांच्या घरी पोहोचले. यावेळी काही कागदपत्रे आणि डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.