पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी संख्या असतानाच भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात लहान मुलांसह 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Bhimashankar Accident )
मिळालेल्या माहितीनुसार, मंचरहून भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या कारची भीमाशंकरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या 2 रिक्षांना जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले. रिक्षांमधील तसेच कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. (Pune Accident)
बिहार : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. जलाभिषेकासाठी मंदिर परिसरात मोठ्या ...
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. (Road Accident )
दरम्यान, कारमधील प्रवाशांनी मद्यसेवन केले असल्याचा संशय स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे. मात्र कारचालक नशेत होता की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताची पाहणी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Maharashtra News)
अपघात नेमका कशामुळे झाला, कारचा वेग किती होता आणि चालकाने मद्यसेवन केले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे भीमाशंकर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांना झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pune News)