मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
दर १५ दिवसांनी तज्ज्ञ डॉक्टर भेट देणार; आरोग्यसेवा, सल्लाही विनामुल्य मुंबई : राज्यातील महिला आणि युवतींमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या 'पॉलीसिस्टिक ...
विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी यंदा दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस आधीच घेण्यात आली होती. राज्यभरात ६४ विविध विषयांची परीक्षा पार पडली. मंडळाच्या माहितीनुसार, परीक्षा शांत, शिस्तबद्ध आणि निकोप वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, ६४ पैकी २० विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; काही शाळांकडे मान्यता नाही तर काही शाळा परवानगीशिवाय स्थलांतरित पुणे : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ...
दरम्यान, विभागनिहाय निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के लागला असून, तो राज्यातील सर्वाधिक आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.४१ टक्के नोंदवण्यात आला आहे.
कोकण- ९७.६२% कोल्हापूर- ९५.४७% मुंबई- ९४.९७% पुणे- ९४.२४% नाशिक- ९०.९३% अमरावती- ९०.५०% नागपूर- ८९.०७% लातूर- ८८.४२% छत्रपती संभाजीनगर- ८८.४१%
राज्याचा एकूण निकाल- ९२.०९%





