BMC News : रुग्णालयात मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध; स्तनाचा कर्करोग पिडीत महिलांची धावपळ वाचेल

- शीव आणि केईएम रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधांचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण सेवा मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचा अभिमान आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मॅमोग्राफी संयंत्र लोकार्पणाचा मान मला मिळाला, याचा आनंद आहे. स्तनाचा कर्करोग महिलांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान आहे. परंतु वेळेत तपासणी, वेळीच निदान आणि योग्य उपचाराच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण मिळवता येते. रुग्णालयात मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध झाल्याने महिलांना तपासणीसाठी इतरत्र धावपळ करावी लागणार नाही. या उपकरणामुळे महिलांमध्ये नियमित तपासणीची सवय वाढेल. निदानातील विलंब कमी होईल आणि कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेला बळ मिळेल, असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.


के. ई. एम. रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) तसेच मॅमोग्राफी मशीन, सर्जिकल पॅथोलॉजी सेमिनार सभागृह, फीजिओलॉजी सेमिनार सभागृह यांचे लोकार्पण शुक्रवारी ०८ मे रोजी महापौर रितू तावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याआधी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय संलग्नित धारावी येथील लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्रात बालरोग, रक्त दोष, कर्करोग व बोनमॅरो ट्रान्सप्लांट केंद्राचे लोकार्पणही करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे, स्थानिक नगरसेवक किरण तावडे, स्थानिक नगरसेविका अर्चना शिंदे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेंद्र मोहिते, अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, अधिष्ठाता डॉ. हरिश पाठक, ‘वेहा फाऊंडेशन’च्या रुमाना हमीद आदी मान्यवर उपस्थित होते.



नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने स्वच्छ, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अतिदक्षता विभागाची सेवा आता उपलब्ध करुन देण्यात आली. अकाली जन्मलेली, कमी वजनाची किंवा जन्मानंतर तातडीच्या वैद्यकीय देखरेखीची गरज असलेल्या नवजात बालकांना या विभागातून उपचार मिळणे शक्य होणार आहे. या सुविधेमुळे नवजात शिशूंची देखरेख अधिक परिणामकारक होईल आणि संसर्ग नियंत्रण शक्य होईल, असेही महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.


लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय संलग्नित लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र (धारावी) येथे ‘जागतिक थॅलेसेमिया दिन’ ८ मे च्या निमित्ताने बालरोग, रक्तददोष, कर्करोग व बोनमॅरो ट्रान्सप्लांट केंद्राचे लोकार्पण शुक्रवारी ८ मे २०२६ रोजी महापौर रितू तावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. एका गंभीर आजाराच्या गरजू रुग्णांना महानगरपालिका आणि ‘वेहा फाऊंडेशन’च्या संयुक्त प्रयत्नातून सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून ६ रुग्णशय्या, डे केअर केमोथेरपी कक्ष, आंतररुग्ण सुविधा देण्यात आली आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. बोनमॅरो ट्रान्सप्लांट उपचार पद्धती उपलब्ध करुन देणारे लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय हे पहिले रुग्णालय असल्याचा अभिमान आहे, असे गौरवोद्गार महापौर रितू तावडे यांनी काढले. थॅलेसेमिया दिनाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांकरिता या रुग्णालयाच्या बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट मार्फत थॅलेसिमिया स्क्रीनिंग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.



मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा मिळतानाच या सुविधांचा फायदा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही होणार आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्याच्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली.

Comments
Add Comment

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर जाऊ शकेल अशी लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६