मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत अपेक्षित जोरदार पाऊस झालेला नसून, काही ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे पावसाची तूट वाढत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रविवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Alert)
कोकणात हलक्या ते मध्यम सरी :
कोकण विभागात सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. पुढील काही दिवस या भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)
मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट उंच ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती अचानक ...
उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता :
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या भागातही पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. काही भागांत हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Alert)
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची प्रतीक्षा :
पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडत असल्या तरी काही भागांत ढगाळ आणि दमट वातावरण कायम आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यासाठी सध्या विशेष पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. (Maharashtra Weather Alert)
मराठवाड्यात पावसाची तूट कायम :
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. पुढील काही दिवस हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Weather Alert)
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे. आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणात तीन ...
विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट :
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी विशेष पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे काही भागांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यासाठीही रविवारी यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील इतर भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Alert)
राज्यात जोरदार पाऊस कधी?
सध्या गोंदिया आणि काही प्रमाणात गडचिरोली वगळता राज्यातील बहुतांश भागांसाठी विशेष पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्याने ऑगस्ट महिन्यातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (Maharashtra Weather Alert)