Ashok Kharat Case : नाशिकमध्ये श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अशोक खरात विरोधात नाशिक पोलीस आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कंबर कसली आहे. खरात विरोधात ठोस पुरावे मिळत असून खरातच पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खरातचे नाशिकच्या एका बँकेतील लॉकर उघडले असता त्यात सोन्या-चांदीसह परकीय चलनाचे घबाड हाती लागले आहे.
खरातच्या बँकेतील लॉकरमध्ये सापडलं घबाड
मुंबई नाका परिसरात असलेल्या एका बँकेत खरात आणि त्याची पत्नी कल्पना यांच्या नावावर असलेल्या लॉकरची ईडीने झडती घेतली. या झडतीत ईडीने खरातच्या आर्थिक साम्राज्यावर घाला घातला असून, यात सुमारे १ कोटी १० लाख रुपयांचे सोने, १ लाख ८९ हजारांची चांदी आणि ५,५०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ५ लाख १७ हजार रुपये) रोख आढळले आहेत. ( Ashok Kharat Case )
- छोट्या व्यवसायांना मिळणार २४ तास ग्राहक सेवा देण्याची ताकद मुंबई : व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं आता भारतातील लहान आणि मध्यम ...
७० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल
खरातने आर्थिक फसवणुकीसाठी एक भयंकर मोडस ऑपरेंडी वापरली होती. त्याने भक्तांच्या नावावर ६० बेनामी खाती उघडली होती. धक्कादायक म्हणजे, या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक होता आणि तो स्वतः सर्व खात्यांवर नॉमिनी होता. या खात्यांमधून आतापर्यंत ७० कोटींहून अधिक रुपयांची संशयास्पद उलाढाल झाल्याचे समोर आले असून सर्व व्यवहार खरातच्या नियंत्रणात होते. ( Ashok Kharat Case )
खरातकडे केवळ रोकडच नाही, तर ८० लाखांची मर्सिडीज बेंझ आणि सुमारे ८० ते ९० मालमत्तांची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत. दैवी शक्तीचा धाक दाखवून खंडणी उकळणे आणि त्यातून मालमत्ता उभी करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय होता. विशेष म्हणजे, या काळ्या धंद्यात नाशिकमधील काही बड़े राजकीय आणि सफेदपोश लोकही सामील असल्याचा संशय आहे. ईडीचा तपास आता त्या बड्या माशांच्या दिशेने वळला असून लवकरच नाशिकमधील काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहेच पण भारतीय संघाच्या कामगिरीत आणखी सुधावरणा ...
दरम्यान, टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान पोलिसांना गुंगारा देऊन लपली होती. कोर्टाने तिचा जामीन नाकारल्यानंतर अखेर पोलिसांनी तिला शोधून काढले. तिच्यासोबत पाच जणांनाही अटक करण्यात आली आहे. आज पोलिसांच्या मोठ्या सुरक्षततेत तिला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.






