मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 19 ऑगस्ट रोजी मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी कशी करायची आणि नियमांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करायची, यावर चर्चा होणार आहे. (Marathi Bhasha)
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गातील एकूण 9 लाख 78 हजार 541 वैध परवाने आहेत. यामध्ये 9 लाख 16 हजार 884 ऑटोरिक्षा आणि 61 हजार 657 टॅक्सी परवान्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे 4 लाख 62 हजार 387 रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक आहेत. (Pratap Sarnaik)
Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग
पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुणे ...
रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा दररोज हजारो प्रवाशांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यात योग्य संवाद होण्यासाठी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याबाबतही उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परिवहन विभागाच्या पुढाकाराने गेल्या साडेतीन महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम’ अभियानाला चालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 1 लाख 65 हजारांहून अधिक चालकांनी या अभियानात सहभाग घेतला आहे. या माध्यमातून अनेक चालकांनी मराठी शिकण्याची तयारी दर्शवली असून प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचा आत्मविश्वासही मिळाल्याचे सांगण्यात आले. (Taxi- Auto Driver)
परिवहन विभागाने 105 दिवस राबविलेले ‘मराठी शिका’ अभियान संपले असले तरी मराठी शिकू इच्छिणाऱ्या चालकांना पुढेही सहकार्य केले जाणार आहे. मात्र, अभियानात सहभागी न झालेल्या आणि अद्याप व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या चालकांबाबत नियमांची अंमलबजावणी कशी करायची, यावर आता सरकारकडून चर्चा केली जाणार आहे.
उद्याच्या बैठकीत या चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी, नियमांचे पालन न करणाऱ्यांवरील कारवाई आणि पुढील कार्यपद्धती याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. (Mumbai News)