Thursday, May 7, 2026

Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी माझा आग्रह नाही, पक्ष जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी माझा आग्रह नाही, पक्ष जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल- छगन भुजबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्यसभेचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरून पक्षात चढाओढ सुरू असतानाच, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या शर्यतीतून स्वत:ला दूर ठेवले आहे. "मी सध्या राज्यात ज्येष्ठ मंत्री म्हणून काम पाहत असून राज्यसभेवर जाण्यासाठी माझा कोणताही आग्रह नाही," असे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राष्ट्रवादीत अंतर्गत स्पर्धा रंगली असतानाच भुजबळांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. छगन भुजबळ म्हणाले की, "मी सध्या राज्यात ज्येष्ठ मंत्री म्हणून काम पाहत आहे. माझ्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने राज्यसभेवर जाण्यासाठी आग्रह धरणे चुकीचे आहे. या जागेबाबत अद्याप पक्षात कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल". असेही ते म्हणाले.

नव्या चेहऱ्याला संधी मिळणार?

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यसभेत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन पाटील हे तीनच खासदार उरले आहेत. रिक्त झालेल्या जागेसाठी पक्षातील अनेक नेत्यांनी रस दाखवल्याने नेतृत्व कोणावर विश्वास दाखवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या नियुक्तीचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता असल्याने पक्ष अत्यंत सावधगिरीने पावले टाकत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >