Thursday, May 7, 2026

Bihar Oath Ceremony 2026 : बिहारमध्ये सम्राट चौधरींचा ‘मेगा’ मंत्रिमंडळ विस्तार; गांधी मैदानावर मोदी-शाहांच्या उपस्थिती शपथविधी सोहळ्याचे आयोजन

Bihar Oath Ceremony 2026 : बिहारमध्ये सम्राट चौधरींचा ‘मेगा’ मंत्रिमंडळ विस्तार; गांधी मैदानावर मोदी-शाहांच्या उपस्थिती शपथविधी सोहळ्याचे आयोजन

पाटणा : बिहारचे नवनियुक्त मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा आज म्हणजेच गुरुवार ७ मे रोजी भव्य विस्तार करण्यात येत आहे. पाटणा येथील गांधी मैदान येथे संपन्न झालेल्या शपथविधी सोहळ्यात (Bihar Oath Ceremony 2026) एनडीएच्या अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

अनेक नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश :

या विस्तारात विजय सिन्हा, दिलीप जयस्वाल, श्रवण कुमार, निशांत कुमार आणि लेसी सिंग यांच्यासह अनेक नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तसेच रामकृपाल यादव, नितीश मिश्रा, अशोक चौधरी, संजय सिंह टायगर आणि दामोदर रावत यांनीही मंत्रीपदाची शपथ (Bihar Oath Ceremony 2026) घेतली. याशिवाय मदन साहनी, भगवान सिंह कुशवाहा, अरुण शंकर प्रसाद, संतोष कुमार सुमन, रमा निषाद, रत्नेश सदा, कुमार शैलेंद्र, शीला कुमार, केदार प्रसाद गुप्ता आणि लखेंद्र कुमार रोशन यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

मोदी-शाहांच्या उपस्थिती शपथविधी सोहळा संपन्न :

या भव्य शपथविधी सोहळ्याला (Bihar Oath Ceremony 2026) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप नेते विनोद तावडे तसेच माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एनडीएतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

[caption id="attachment_1022641" align="alignnone" width="650"] Bihar Oath[/caption]

प्रथमच सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली :

दरम्यान, नितीश कुमार यांनी राज्यसभेवर निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बिहारमध्ये प्रथमच भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले असून सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. भाजप, जेडीयू, एलजेपी (रामविलास), हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षांचा एनडीए आघाडीत समावेश आहे. (Bihar Oath Ceremony 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >