Mayor Ritu Tawde : नालेसफाई कामांच्या ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसवा ; महापौर रितू तावडे यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत ज्या ठिकाणी नाले स्वच्छतेची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधींना नाले स्वच्छतेच्या कामांचे प्रत्यक्ष निरीक्षण करता यावे व प्रगतीची माहिती सुलभपणे उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नाले स्वच्छता मोहीम अधिक परिणामकारक व्हावी, यासाठी काटेकोर नियोजन व अंमलबजावणी वर विशेष भर द्यावा, असे विविध निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले. तसेच आवश्‍यक त्‍या ठिकाणी रोबोटिक यंत्रणेचा वापर करावा,असेही निर्देश दिले आहेत.



मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्‍थायी समिती अध्‍यक्ष प्रभाकर शिंदे यांच्‍यासमवेत मंगळवारी ५ मे २०२६ रोजी सकाळी पूर्व उपनगरांतील विविध ठिकाणी सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. ‘एस आणि टी’ प्रभाग समिती अध्यक्ष साक्षी दळवी, एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष आशा मराठे आणि एल प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, नगरसेवक दीपक सावंत, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेवक सुषम सावंत, नगरसेविका चित्रा सांगळे, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) संजय इंगळे, उप प्रमुख अभियंता (रस्ते) विशाल ठोंबरे, सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) शंकर भोसले यांच्‍यासह पर्जन्य जलवाहिन्या, रस्‍ते व वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.



प्रारंभी, महापौर तावडे यांनी भांडुप (पूर्व) येथील उषा नगर नालेस्‍वच्‍छता कामाची पाहणी केली. उषा नगर नाल्‍यावरील मध्‍य रेल्‍वे रूळाखालील अंदाजे ३ मीटर रूंदीच्‍या चार पेटिका मोरीच्‍या स्‍वच्‍छतेचे जटील काम स्‍वयंचलित स्‍वींग लोडर या मशीनचा वापर करून करण्‍यात येत आहे. याबाबतची माहिती घेतल्‍यावर महापौर तावडे म्‍हणाल्‍या की, नाल्‍यास संरक्षक भिंत उभारून सुरक्षितता आणि दीर्घकालीन उपाययोजना सुनिश्चित करावी. आवश्‍यक त्‍या ठिकाणी रोबोटिक यंत्रणेचा वापर करावा.त्‍यानंतर, महापौर तावडे यांनी मुलुंड (पूर्व) येथील गव्हाणपाडा अग्निशमन केंद्राजवळील बाऊंड्री नाल्‍याची पाहणी केली. ४ मे २०२६ पर्यंत या नाल्‍यातून ३ हजार ३४१ मेट्रिक टन गाळ काढण्‍यात आला आहे. नाल्यांतील गाळ काढण्याच्या कामांना तातडीने गती देऊन ती सर्व कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश महापौर तावडे यांनी यावेळी दिले.


 


घाटकोपर येथील गारोडिया नगर मेट्रो स्‍थानकाखालील सोमय्या नालेस्‍वच्‍छतेची पाहणी करताना महापौर श्रीमती तावडे म्‍हणाल्‍या की, दिनांक ४ मे २०२६ पर्यंत १२१ मेट्रिक टन गाळ काढण्‍यात आला आहे. नालेस्‍वच्‍छतेचे काम प्रगतिपथावर असले तरी ३१ मे २०२६ पर्यंत ठरवलेल्या उद्दिष्टाइतका पूर्ण गाळ उपसा करण्‍याचे उद्दिष्‍ट आहे. त्‍यासाठी अधिकचे मनुष्‍यबळ, यंत्रसामुग्री वापरावी, असे महापौर म्हणाल्या. कुर्ला (पश्चिम) येथील साकीनाका मेट्रो स्‍थानकाखालील नाला क्रमांक १० ची पाहणी केल्‍यानंतर प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींशी बोलताना महापौर तावडे म्‍हणाल्‍या की, सखल भागामुळे या परिसरात पाणी साचण्‍याची समस्‍या उद्भवते. त्‍यावर मात करण्‍यासाठी व सांडपाणी वहन प्रक्रिया सुलभ व्‍हावी यासाठी विविध उपाययोजना राबवाव्‍यात. सफेद पूल येथील नाल्‍याची आधुनिक यंत्रांनी स्‍वच्‍छता करावी. गाळासमवेतच तरंगत्‍या वस्‍तू, नाल्‍यात टाकलेल्‍या गृहोपयोगी साहित्‍याची विल्‍हेवाट लावावी, असे निर्देश महापौरांनी दिले.





मुलुंडमध्ये ७५०० प्रकल्प बाधितांच्या सदनिका : 


नालेस्‍वच्‍छतेसमवेतच महापौर रितू तावडे यांनी टी विभागातील टाटा कॉलनी नवीन विकास आराखडा रस्‍ता आणि मुलुंड (पूर्व) येथील पीएपी मार्ग येथील रस्‍ते काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली. रस्‍ते कामांची गुणवत्‍ता, विविध उपयोगिता वाहिन्या, सुगम्‍य पदपथ, रस्त्यालगतची झाडे, पाणी निचरा होण्याची व्यवस्था याबाबत अभियंत्‍यांनी दक्ष राहावे. रस्‍ते कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुले करावेत, असेदेखील निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले. महानगरपालिकेच्‍या वतीने मुलुंड (पूर्व) येथे प्रकल्‍पबाधितांसाठी ७ हजार ५०० सदनिकांच्या गृहप्रकल्‍पाचे बांधकाम सुरू आहे. या गृहप्रकल्‍पाला भेट देत महापौर तावडे यांनी सदनिकांची पाहणी केली. तसेच, हा गृहप्रकल्‍प कालमर्यादेत पूर्ण करून प्रकल्‍पबाधितांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशी सूचना केली.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान