Mumbai Birth Certificate Scam : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी SIT तपास करणार

मुंबई : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी एसआयटी तपास करणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक (Special Investigation Team or SIT) स्थापन करण्यात आले आहे. विशेष तपास पथकात अर्थात एसआयटीत पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण विभागाचे पोलीस उप आयुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण - मध्य, गुन्हे शाखा) हे पाच अधिकारी आणि त्यांच्या मदतीला इतर पोलीस अधिकारी - कर्मचारी असतील. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे एसआयटी तपास करणार आहे.


याआधी भारतीय जनता पार्टीने मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी तपास करण्याची मागणी केली होती. परदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य रोखण्यास मदत व्हावी तसेच देशाची सुरक्षा अबाधित राखणे शक्य व्हावे यासाठी तपासाची मागणी करण्यात आली होती. भाजपचे नगरसेवक नील सोमय्या यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मुंबई महापालिकेत ही मागणी केली होती.


हजारोंच्या संख्येने बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुंबईत वास्तव्यास आहेत, असा संशय भाजपने व्यक्त केला आहे. या संशयाची गंभीर दखल घेऊन मुंबई महापालिका आयुक्त रितू तावडे यांनी पोलीस तपासाचे निर्देश दिले. यानंतर हाती आलेल्या प्राथमिक माहितीचा आढावा घेऊन तसेच खबऱ्यांकडून प्रकरणाची व्याप्ती समजून घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी सखोल तपासाकरिता एसआयटीची स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.


Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान