Kandivali Dr. Babasaheb Ambedkar Hospital : कांदिवलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी प्रकल्प कामे वेगात

- अतिरिक्त् आयुक्त विपीन शर्मा यांनी घेतला प्रत्यक्ष ठिकाणी जावून आढावा


मुंबई विशेष प्रतिनिधी


पश्चिम उपनगरातील नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा नजीकच्या भागात उपलब्ध व्हाव्यात, याअनुषंगाने रुग्णालय आणि प्रसुतिगृह पुनर्विकास प्रकल्पांची कामे वेगाने करावीत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे सुरु असणारा ३२५ रुग्णशय्या क्षमतेच्या सुपरस्पेशालिटी प्रकल्पाचे काम वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी मंगळवार ५ मे २०२६ रोजी स्थळभेटी दरम्यान दिल्या. तसेच ओशिवरा प्रसुतिगृहाच्या १५० रुग्णशय्येच्या क्षमता विकासाचे काम वेगाने करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.



यावेळी प्रमुख वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत पवार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रुग्णालयाशी संबंधित प्रयोगशाळांसाठी एनएबीएच मानांकन मिळवण्यासाठीच्या आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात यावा. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रियागृह, रुग्ण कक्ष याठिकाणी भेट देत डॉ. विपिन शर्मा यांनी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयाच्या यंत्रणेवर वाढणारा ताण पाहता, रुग्णालय इमारतीचे अतिरिक्त मजले वाढवण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. विपिन शर्मा यांनी इमारत रुग्णालय पायाभूत सुविधा कक्षाला दिले. सद्यस्थितीला रुग्णालयाची क्षमता ४४४ रुग्णशय्या इतकी आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून पश्चिम उपनगरातील साधारणपणे ३० लाख ते ४० लाख इतक्या लोकसंख्येसाठी या रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देण्यात येते.



नव्याने उभारण्यात येणाऱया सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून ३२५ रुग्णशय्या क्षमतावाढ निर्माण करण्यात येत आहे. याठिकाणी कर्करोग, ह्दयरोग, मज्जातंतू विभाग, यकृत व मूत्रपिंड विभाग यांचा समावेश आहे. सदर इमारतीच्या अकरा मजली इमारतीपैकी ९ मजले बांधकाम पूर्ण झाले आहे. धर्मशाळेच्या इमारतीचे क्षमतावाढ करण्याचे निर्देश डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.



गोरेगाव येथील ३० रुग्णशय्या क्षमतेच्या टोपीवाला मॅटर्निटी होम येथे डॉ. विपिन शर्मा यांनी भेट दिली. याठिकाणी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. तसेच रुग्णांशीही संवाद साधला. यावेळी पुनर्विकासाच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला. तसेच ओशिवरा प्रसुतिगृह येथील क्षमतावाढीच्या प्रकल्पाच्या कामाची माहितीदेखील डॉ. विपिन शर्मा यांनी घेतली. याठिकाणी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत १५० रुग्णशय्या क्षमतेच्या प्रसुतिगृहाचा विकास हाती घेण्यात आला आहे. या कामांची जलदगतीने पूर्तता करण्यासाठी निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील