CSKvsDC : चेन्नई सुपरकिंग्सचा विजय, दिल्ली कॅपिटल्सचा पराभव

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग २०२६मध्ये चेन्नई सुपर किंग्सने प्ले ऑफचे आव्हान कायम राखले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने मॅच विनिंग खेळी केली. सीएसकेने या विजयासह आयपीएल २०२६च्या गुणतालिकेमधील आपले सहावे स्थान मजबूत केले आहे, तर दिल्लीचा पुढील मार्ग खडतर झाला आहे. दिल्लीचा १० सामन्यांतील हा सहावा पराभव ठरला आणि ते ८ गुणांसह सातव्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांना उर्वरीत ४ सामने जिंकून १६ गुणांपर्यंत पोहोचता येईल, परंतु प्ले ऑफसाठी त्यांना अन्य संघांवर अवलंबून रहावे लागेल.


दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर मंगळवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजीपुढे यजमान दिल्लीची फलंदाजी हतबल झाल्याचे पहावयास मिळाली. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण कर्णधाराचा निर्णय फलंदाजांना सार्थ करता आला नाही, त्याउलट दिल्लीच्या गोलंदाजांनी टॉस हरलो, पण सामना नाही हरणार या जिद्दीने गोलंदाजी केल्याने दिल्लीचा डाव अवघ्या धावांतच अडखळला. दिल्ली कॅपिटल्सचे दोन्ही सलामीवीर ३६ धावांवर माघारी पाठवून चेन्नईने सामन्यावर पकड घेतली होती. करुण नायरने ( १३) आणखी एक संधी गमावली. नूर अहमदच्या गोलंदाजीवर गुरजपनीत सिंगने झेल टिपला. नूरने त्याच्या पुढच्या षटकात नितीश राणाचा ( १५) काटा काढून चेन्नईला ला खूप मोठे यश मिळवून दिले. ११ व्या षटकात गुरजपनीतच्या गोलंदाजीवर त्रिस्तान स्तब्सचा सोपा झेल नूरने टाकला नसता, तर दिल्लीची अवस्था ५ बाद ६२ अशी झाली असती. पण, त्याच षटकात अक्षर पटेलची ( २) विकेट काढून गुरजपनीतने दिल्लीला पाचवा धक्का दिला. दिल्ली कॅपिटल्सने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवलेल्या समीर रिझवीने २४ चेंडूत चार षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या.


स्टब्सचा झेल सोडणे चेन्नईला महागात पडले आणि समीर रिझवीसोबत त्याने ६५ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकात स्टब्स माघारी परतला आणि त्याने ३१ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या. रिझवीने २४ चेंडूंत ४० धावांची नाबाद खेळी करताना दिल्लीला ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवले. शेवटच्या षटकात दिल्लीने २० धावा कुटल्या. नूर अहमदने २२ धावांत दोन बळी घेतले. अकील होसेन, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग, जेमी ओव्हरटनने प्रत्येकी एक बळी घेतला.


चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना दिल्ली कॅपिटल्सच्या धावगतीला चांगली लगाम लावली होती. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. अशात चेन्नईने चांगला मारा केला, परंतु दिल्लीच्या त्रिस्तान स्तब्सचा झेल सोडणे त्यांना महागात पडले. स्तब्स आणि इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवी, या जोडीने चेन्नईच्या मेहनतीवर पाणी फिरवले आणि सन्मानजनक लक्ष्य उभे केले.


पथूम निसंका ( १९) व लोकेश राहुल ( १२) या सलामीवीरांसह नितीश राणा ( १५), करुण नायर ( १३) व कर्णधार अक्षर पटेल ( २) यांना माघारी पाठवून दिल्लीची अवस्था ५ बाद ६९ अशी केल्यानंतरही चेन्नईला प्रत्युत्तर मिळाले. त्रिस्तान स्तब्सने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलत ३१ चेंडूंत ३८ धावांची खेळी करून समीर रिझवीसह अर्धशतकी भागीदारी केली. समीरने २४ चेंडूंत नाबाद ४० धावा करून दिल्लीला ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवले. १ ते १५ षटकांत दिल्लीची धावगती ६.३०च्या सरासरीने होती, तिच १६ ते २० षटकांत ११.६ इतकी वाढली.


स्तब्स व रिझवी यांची ६५ धावांची भागीदारी ही दिल्ली कॅपिटल्सकडून सीएसके विरुद्ध सहाव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकासाठी झालेली संयुक्त सर्वोत्तम ठरली. २०१८ मध्ये विजय शंकर व हर्षल पटेल यांनी नाबाद ६५ धावा जोडल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरूवात काही खास झाली नाही. ऋतुराज ६ धावांवर लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. सहाव्या षटकात संजू सॅमसननेही एनगिडीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला आणि आशुतोष शर्माने झेल टिपण्यासाठी स्वतःला झोकून दिले. पण, त्याचा प्रयत्न थोडक्यात फसला.


सीएसकेने पॉवर प्लेमध्ये १ बाद ४४ धावा केल्या. संजूने सहाव्या षटकात दोन खणखणीत षटकात खेचून १६ धावा जोडल्या. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने दिल्ली विकेट मिळवून दिली. लोकेश राहुलच्या चपळ स्टम्पिंगमुळे उर्विल पटेल ( १७) बाद झाला. पण, संजू सॅमसन मैदानावर उभा राहिला आणि ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याला कार्तिक शर्माची साथ मिळाली आणि दोघांनी संघाला ८ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
संजू व कार्तिक यांनी ६६ चेंडूंत ११४ धावांची नाबाद भागीदारी केली. संजू ५२ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ८७ धावांवर नाबाद राहिला, तर कार्तिकने ३१ चेंडूंत ४१ धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईने १७.२ षटकांत २ बाद १५९ धावा केल्या.

Comments
Add Comment

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

National Sports Awards : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, विजेत्यांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू

नवी दिल्ली : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची

Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास

IND vs SL 1st Test: मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये! श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूला दुखापत; गॉल टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय