West Bengal Election 2026 : दीदींचं राज्य गेलं; पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं!

पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज ४ मे रोजी जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातील हा थेट संघर्ष यंदा भारतीय राजकारणातील सर्वात मोठी लढाई मानली जात आहे.


पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली आहे. जवळपास १५ वर्षांनंतर बंगालमध्ये सत्तापालट झाली आहे. पुन्हा एकदा तिथे कमळ फुललं आहे. एकूण २९४ पैकी १९२ जागांवर भाजप निवडून आली आहे. त्यामुळे भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.



विक्रमी मतदान:


२०२६ ची ही निवडणूक दोन टप्प्यांत (२३ एप्रिल आणि २९ एप्रिल) पार पडली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बंगालने पुन्हा एकदा मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.



पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ या ३४ वर्षांच्या कालावधीत साम्यवादी विचारांच्या अर्थात कम्युनिस्ट विचारांच्या पक्षांचीच म्हणजेच डाव्यांची सत्ता होती. यानंतर तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. ममता बॅनर्जी २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आहेत. या सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली होती. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला तृणमूलचा पराभव करणे जमले नाही. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये कमळ फुलवून दाखवले.



एकूण मतदान :


सुमारे ९२.९३% इतके ऐतिहासिक मतदान झाले आहे.जे स्वातंत्र्यानंतरचे राज्यातील सर्वोच्च मतदान ठरले आहे. पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान झाले.



पश्चिम बंगालचा निकाल केवळ एका राज्याचा निकाल नसून तो आगामी राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारा आहे.



आसाममध्ये देखील भाजपाची विजयी हॅट्रिक :


बंगालसोबतच आसाममध्ये देखील भाजपाने विजयाची हॅट्रिक केली आहे. आसामच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येत असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आसामच्या १२६ जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पार्टी ७९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे. बीओपीएफ १०, एजीपी ९ आणि एआययूडीएफ २ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत १२४ जागांचे आकडे हाती आले असून भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता येत असल्याचे दिसत आहे.


मागच्यावेळी भाजपने ६० जागा जिंकून युतीच्या जोरावर सत्ता मिळवली होती. यावेळी भाजपची एकहातीच सत्ता येताना दिसत आहे.


Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे