America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक सुरू होणार नसल्याचे इराणने जाहीर केले आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ‘अत्यंत वाईट देश’ संबोधत युद्ध सुरू राहिल्यास अमेरिकन नागरिकांना इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागतील, असे म्हटले आहे.


इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम गरीबाबादी यांनी, ‘पराभवाची वस्तुस्थिती स्वीकारेपर्यंत आणि काल्पनिक अपेक्षा सोडेपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी इराणच्या नियंत्रणाखालीच राहील,’ असा इशारा दिला. परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनीही अमेरिकेसोबत चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सांगितले.


युद्धापूर्वी जगातील सुमारे पाचवा हिस्सा तेलवाहतूक या सामुद्रधुनीतून होत होती. मात्र सध्या या मार्गावरील जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. शुक्रवारी केवळ दोन जहाजांनी सामुद्रधुनी ओलांडली आणि त्यापैकी एकाही जहाजातून कच्च्या तेलाची वाहतूक झाल्याचे आढळले नाही.



दरम्यान, अमेरिकेत पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी प्रतिगॅलन सरासरी किंमत सुमारे ४.०८ डॉलरवर पोहोचली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ती २९ टक्क्यांनी वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतही शुक्रवारी प्रतिपिंप सुमारे एक डॉलरची वाढ झाली.


इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देशातील वाढत्या महागाईसाठी अमेरिकेची बंदरे रोखण्याची कारवाई आणि तेल निर्यातीवरील निर्बंधांना जबाबदार धरले. तसेच होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर हल्ल्यांच्या घटनाही घडल्या असून, एका मालवाहू जहाजाला शुक्रवारी अज्ञात वस्तूचा धक्का बसला. त्यामुळे या संघर्षाचा जागतिक तेलपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.


येमेनमधील हुती बंडखोरांच्या कारवायांमुळे संघर्ष अधिक व्यापक होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. शुक्रवारी लाल समुद्रातील मोखा बंदरावर सहा क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे येमेन सरकारने सांगितले.

Comments
Add Comment

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

Nepal Agniveer Recruitment Rally : ‘आम्हालाही भारतीय सैन्यात भरती करा!’ अग्निवीर योजनेसाठी नेपाळचे हजारो तरुण रस्त्यावर

काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी

Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर