Monday, May 4, 2026

Tamil Nadu Election : थलपथी विजयच्या पराभवाची अफवा , निकालाच्या भीतीने कट्टर चाहत्याचे धक्कादायक कृत्य, थेट...

Tamil Nadu Election : थलपथी विजयच्या पराभवाची अफवा , निकालाच्या भीतीने कट्टर चाहत्याचे धक्कादायक कृत्य, थेट...

Tamil Nadu Election Results : तमिळनाडूसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली आहे. दरम्यान, तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे, अभिनेता आणि ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाचे प्रमुख विजय यांचा निवडणुकीत पराभव झाल्याच्या अफवा ऐकून एका २८ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. (Tamil Nadu Election Results)

नेमकं काय घडलं?

कृष्णगिरीमधील २८ वर्षीय के. महेंद्रन हा सुपरस्टार विजय यांचा कट्टर समर्थक आहे. मतमोजणीच्या काही तास आधी टीव्हीके निवडणूक हरत असल्याची अर्थात थलापती विजय निवडणूक हरत असल्याची अफवा पसरली होती. या अफवेनंतर आपला लाडका नेता निवडणुकीत पराभूत होईल या भीतीने आणि पसरलेल्या अफवांना बळी पडून के. महेंद्रनने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने आपल्या घराबाहेर चाकूने स्वतःचा गळा चिरून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. (Tamil Nadu Election Results)

सुदैवाने, स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला कृष्णगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. एकीकडे विजय यांच्या चाहत्याने टोकाचे पाऊल उचलले असताना, प्रत्यक्ष निवडणूक निकालांचे कल मात्र थलपथी विजय यांच्यासाठी ऐतिहासिक विजयाची साक्ष देत आहेत.

तरुणाची प्रकृती चिंताजनक (Tamil Nadu Election Results)

कृष्णगिरी शहर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या घटनेमागील नेमक्या परिस्थितीचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या निवडणूक वातावरणात, अफवांचा होणारा परिणाम आणि समर्थकांच्या भावनिक प्रतिक्रिया यांविषयीची चिंता या घटनेमुळे अधिकच वाढली आहे. (Thalapathy Vijay)

थलपथी विजय राजकारणातही किंग ठरणार (Tamil Nadu Election Results)

तमिळनाडूच्या २३४ जागांच्या प्राथमिक कलांमध्ये विजय यांच्या पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या दशकानुदशकांच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. ताज्या निकालानुसार, टीव्हीके (TVK): १०५ जागा, AIADMK आघाडी: ७५ जागा आणि DMK आघाडी: ५० जागांवर आघाडीवर आहेत. हे कल पाहता तमिळनाडूमध्ये मोठ्या सत्तांतराचे संकेत मिळत आहेत. जर हे कल अंतिम निकालात परावर्तित झाले, तर थलपथी विजय राजकारणातही किंग ठरतील आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतील.

Comments
Add Comment