Devendra Fadnavis : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लवकरच येणार नवे धोरण

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता तातडीने मार्गी लागणार आहे. या प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेल्या ‘हाउसिंग स्टॉक’चा (घरांचा साठा) साठा करून न ठेवता, त्याचा प्रभावी आणि सुनियोजित वापर करण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक नवे धोरण अमलात आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या विशेष आढावा बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.



मुंबईतील रस्ते, मेट्रो आणि अन्य महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांच्या कामांना सध्या प्रचंड वेग आला आहे. मात्र, या प्रकल्पांच्या वाटेत येणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन हा प्रशासनापुढील मोठा पेच होता. आता नव्या धोरणामुळे विस्थापित कुटुंबांना हक्काचे घर वेळेत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, घरांच्या वाटपातील तांत्रिक अडथळे दूर होऊन प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



पायाभूत प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत अधोरेखित केले. घरांचा साठा करून ठेवण्यापेक्षा, त्याचा वापर अधिक ‘लोकाभिमुख’ कसा करता येईल, यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे