India and Japan Relations : अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी जपानच्या मुंबईतील वाणिज्यदूत; मराठी शिकणार असल्याची माहिती

सातो हतामी यांनी घेतली राज्यपालांची भेट; विद्यापीठ तसेच सांस्कृतिक स्तरावर सहकार्य वाढवण्यावर चर्चा


मुंबई : अलाहाबाद येथून हिंदी भाषेचे शिक्षण घेतलेल्या व अस्खलित हिंदी बोलणाऱ्या जपानच्या नवनियुक्त वाणिज्यदूत (श्रीमती) सातो हितोमी यांनी सोमवारी (दि. ४ मे) राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. हितोमी यांनी भारतात दोन वर्षे शिक्षण घेऊन नवी दिल्ली येथील जपानच्या भारतीय दूतावासात एकूण साडे नऊ वर्षे कार्य असून हिंदी पाठोपाठ लवकरच मराठी भाषा शिकणार आहेत.


ओसाका विद्यापीठातील प्राध्यापक अकिरा ताकाहाशी यांनी तब्बल १५०० पानांचा मराठी - जपानी शब्दकोश तयार केला असून उभय भाषांची लिपी देवनागरी असल्यामुळे मराठी शिकणे सोपे जाईल अस त्यांच मत आहे.



भारत आणि जपानचे ७५ वर्ष जून राजनैतिक संबंध 


पुढील वर्षी भारत व जपान राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र व जपानमध्ये मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, यांसह विविध पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये सहकार्य सुरु असून हे सहकार्य शिक्षण, क्रीडा, संस्कृती व इतर क्षेत्रात देखील वाढविले जाणार आहे.  जपानच्या वाकायामा प्रांताचे महाराष्ट्राशी अगोदरच सहकार्य सुरु असल्याचे सांगून येत्या नोव्हेंबर महिन्यात जपान मुंबईत एका शैक्षणिक परिषदेचे आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कौशल्य क्षेत्रात जपान महाराष्ट्राला सहकार्य करीत असून टोयोटा कंपनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत कार्य केले जात आहे.


भारत आणि जपानच्या राजनैतिक संबंधाशिवाय त्यांनी पर्यटणावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. जपानला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्याबद्दल हितोमी यांनी आनंद व्यक्त केला. नवनियुक्त जपानी वाणिज्यदूतांचे राज्यात स्वागत करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांना त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठ स्तरावर शैक्षणिक सहकार्य वाढविण्याची विनंती केली आहे.



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पूर्वीपासूनच जपानी भाषा विभाग कार्यरत असून अलीकडेच नागपूर येथील विद्यापीठाने देखील जपानी भाषा विभाग सुरु केला असल्याची माहिती राज्यापालानी दिली. जपान - भारत राजनैतिक संबंधांना पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना हे वर्ष साजरे करताना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मदतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे.


जपानी भाषेतील साहित्य, लघुकथा, कविता मराठी भाषेत व मराठी साहित्य जपानी भाषेत भाषांतरित करण्याच्या कार्याला चालना देण्यात यावी असे सांगून अनुवादाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अनुवादकांना राज्यातील जपानी कंपन्यांच्या सहकार्याने सुवर्ण पदके देण्याची योजना राबवावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. जपानी वाणिज्य दूतावासात मराठी भाषेचे वर्ग सुरु केल्यास राज्यातील विद्यापीठातर्फे अध्यापनाची सोय करण्यात येईल असे राज्यपालांनी सांगितले.


जपानचे पॅनासॉनिक, हिताची, दाईकिन यांसारखे अनेक ग्राहकोपयोगी ब्रॅण्ड्स अनेक वर्षांपासून भारतात असल्यामुळे ते लोकांना भारतीय ब्रँड वाटत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. गेली तीन वर्षे मुंबईत कार्यरत असलेले जपानचे वाणिज्यदूत असलेले यागी कोजी यांची अन्यत्र बदली झाल्यानंतर सातो हितोमी यांची मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मुंबईची लाईफलाईन देणार गुड न्यूज! मध्य रेल्वेवर स्वातंत्र्यदिनापासून 15 डब्यांच्या आणखी 22 लोकल धावणार

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणखी 22 उपनगरीय लोकल गाड्यांचे 12 डब्यांवरून 15

Government Officers : बदलीनंतरही शासकीय घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा भत्ता रोखणार

- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली

Water Resources Department : धरणांच्या काठी पर्यटनाला येणार नवा बहर

- 'जलसंपदा' आणि 'पर्यटन' विभागाचा संयुक्त उपक्रम; जायकवाडी, कोयना, उजनीसह १० प्रमुख धरणांचा समावेश मुंबई : अथांग

MLA Sangram Jagtap : टिळा लावल्यामुळेच धर्मांध शक्तींकडून धीरज परदेशीची हत्या

- आमदार संग्राम जगताप; तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न मुंबई : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत

Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये

FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परि