FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबईअन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परिसरात 'पार्ले अ‍ॅग्रो' कंपनीच्या गोदामावर अचानक धाड टाकून, मुदत संपलेल्या (एक्सपायरी डेट) फ्रुटी, अ‍ॅपे फिज, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूसचा १ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे. चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील एल. यु. गडकरी मार्गावरील प्रयाग नगरमधील गोदामावर ही कारवाई करण्यात आली. एफडीएच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू केलेले हे शोधकार्य १४ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजेपर्यंत सलग ११ तास सुरू होते.



तपासणीदरम्यान मुदत संपलेल्या उत्पादनांचा मोठा साठा आढळून आल्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गोदाम सील केले आहे. याशिवाय मालाची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. एफडीएचे पुढील आदेश येईपर्यंत या गोदामातून कोणत्याही अन्नपदार्थाची विक्री किंवा वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.



राज्यात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ निर्मिती संस्था आणि हॉटेल्सवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध 'डोमिनोज पिझ्झा' चालवणाऱ्या जुबिलेंट फूडवर्क्स लि.च्या चार आऊटलेट्सचे खाद्य व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम), बोरीवली (पश्चिम) आणि घाटकोपरच्या आर-सिटी मॉल मधील तीन, तर सातारा जिल्ह्यातील एका आऊटलेटचा समावेश आहे.



तपासणीदरम्यान या आऊटलेट्समध्ये एफएसएसएआय परवाना न दर्शवणे, पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता, अन्न साठवणुकीतील त्रुटी, कीटक नियंत्रणाचा (पेस्ट कंट्रोल) अभाव आणि स्वच्छतेच्या मानकांचे उल्लंघन आढळून आले होते. बोरीवली येथील आऊटलेटमध्ये १५ टक्के नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. या सर्व आऊटलेट्सना कच्चे व शिजवलेले अन्न वेगळे ठेवणे, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांमध्ये फरक ठेवणे, फ्रीझरचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि उपकरणांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश एफडीएकडून देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई

BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु https://prahaar.in/2026/08/14/46-trees-affected-by-the-redevelopment-of-ramabai-and-kamraj-nagar-in-ghatkopar-mmrda-to-plant-955-trees/ मुंबई (विशेष

MMRDA : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरच्या पुनर्विकासात ४६ झाडे बाधित; एमएमआरडीएकडून ९५५ झाडे लावून घेतली जाणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरमधील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी हाती घेण्यात

Train MegaBlock : पश्चिम रेल्वेचा वीकेंडला बोरिवली-भाईंदर दरम्यान जंबो ब्लॉक; गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर

मुंबई: