- आमदार संग्राम जगताप; तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न
मुंबई : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची झालेली हत्या ही कपाळावर भगवा टिळा लावल्यामुळेच धर्मांध शक्तींकडून करण्यात आली आहे, असा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून पोलीस तपास वेगळ्या दिशेने भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनाकडे विशेष मागण्या मांडल्या असून, लवकरच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Ahilyanagar)
अहिल्यानगर येथील दर्गादायरा कब्रस्तान परिसरात ७ ऑगस्ट रोजी स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीसाठी गेले असता धीरज परदेशी यांच्यावर ६ ते ८ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज यांचा ९ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण झाला होता. अंत्यविधी पार पडल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा दावा जगताप यांनी केला.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पीएम विश्वकर्मा ...
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कागदपत्रे तयार होण्यापूर्वीच अभियोग पक्षाची बाजू मांडण्यासाठी सक्षम आणि चांगला सरकारी वकील नियुक्त करावा, अशी प्रमुख मागणी जगताप यांनी केली. घटनेमागील मुख्य सूत्रधार वेगळेच असून पोलीस त्याकडे कानाडोळा करत आहेत. ज्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने नोटीस बजावली होती, त्याविरोधात उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवण्यात आली आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे. (Crime)
धीरजच्या पत्नीला सरकारी नोकरी द्या
धीरज परदेशी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला सन्मानजनक सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. शासनाकडून ही मदत मिळणे गरजेचे असून, हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनेही या कुटुंबाला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.