Hema Malini: थलपती विजय होऊ शकतात तामिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री; हेमा मालिनी यांचा अंदाज

चेन्नई : अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीतील निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी पुदुच्चेरीमधील भाजपच्या विजयाचे कौतुक करत ते चांगल्या प्रशासनाचे फलित असल्याचे म्हटले. तर तामिळनाडूमध्ये अनेक दशकांपासून असलेल्या द्रविड पक्षाच्या वर्चस्वाला मोठे आव्हान मिळाल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.



हेमा मालिनी यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने नव्या चेहऱ्याला म्हणजेच विजय (थलपती विजय) यांना मतदान केले. हा निकाल एक प्रकारची राजकीय त्सुनामी ठरली असून त्याचा अंदाज कुणालाही नव्हता.


त्या पुढे म्हणाल्या की, यापूर्वी तमिळनाडूमध्ये एम.जी. रामचंद्रन आणि जयललिता यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी मुख्यमंत्री हे पद भूषवले आहे. आता विजयही त्याच मार्गावर वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. “मी विजयला त्यांच्या नव्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा देते. ते तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्रीही होऊ शकतात,” असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



दरम्यान, २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत तमिलगा वेत्री कझगम (TVK) या विजय यांच्या पक्षाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे हा विजय अधिक महत्त्वाचा ठरला आहे. हेमा मालिनी यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.


विजय यांना केवळ हेमा मालिनीच नव्हे, तर नानी, टायगर श्रॉफ यांसारख्या कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्रिशा कृष्णन त्यांना भेटण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहोचल्याचीही माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे