Baramati Bypoll Election 2026 Result : पहिल्या फेरीत सुनेत्रा पवार २६,७७३ मतांनी आघाडीवर

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati Byelection Result 2026) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. सध्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुनेत्रा पवार यांनी २६ हजार ७७३ मतांची मोठी आघाडी घेतली आहे.


बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. तर राहुरीतून शिवाजीराव कर्डिले यांचे पूत्र अक्षय कर्डिले यांच्यासह ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकाही उमेदवार नाही, नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार आहेत. उर्वरित २१ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामध्ये बारामतीतीलच ८ जण, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावातील एक अपक्ष उमेदवार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे.



बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६५०० मतांची आघाडी घेतली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत ७१.८६ टक्के मतदान झालेलं. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केलं.



टपाली मतदान आणि मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६५०० मतांची आघाडी घेतलेली. तर, आता तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार २६ हजार ७७३ मतांनी आघाडीवर आहेत.



बारामती पोटनिवडणूक : पहिल्या फेरीत कोणाला किती मतं?


पहिल्या फेरीत


- सुनेत्रा पवार : ८८२८ मतं
- करुणा मुंडे : १० मतं
- अभिजीत बिचुकले : ७ मतं
- नोटा : २८

Comments
Add Comment

Ganeshotsav : गणपती बाप्पा मोरया ! विघ्नहर्त्याचे कृपेने गणेशोत्सवातील मोठे विघ्न टळले; गणेश भक्त, मूर्तिकार, कामगार, गणेशोत्सव मंडळांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : गणेश मूर्ती विसर्जनाबाबत गतवर्षी म्हणजे २०२५ ला न्यायालयाने दिलेल्या निवाड्या प्रमाणे याही वर्षी

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात

Road Accident : नैनितालमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यामुळे २० पर्यटक जखमी

नैनिताल : चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेला २४ तास होण्याआधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी

Mantralaya : मंत्रालयातील कॅन्टीनचा 'लूक' बदलणार

- ३ कोटींचा निधी मंजूर; खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासोबत स्वच्छतेवर भर देणार मुंबई : राज्याचे प्रशासकीय

Navi Mumbai Traffic : पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्टला वाहतूक निर्बंध; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील

Government Officers : बदलीनंतरही शासकीय घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा भत्ता रोखणार

- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली