नैनिताल : चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेला २४ तास होण्याआधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना झाली. नैनितालमध्ये पर्यटकांना घेऊन जात असलेला टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला. या दुर्घटनेत २० पर्यटक जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रामगढ आणि भवाली येथून पोलीस पथके तसेच SDRF यांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना रामगढच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर (सीएचसी) येथे नेण्यात आले आहे.
चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ...
नैनितालमध्येच भवाली - रामगढ रस्त्यावर एक कार घसरून ५० मीटर खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच तिथे मदतकार्य सुरू करण्यात आले. कुलाटी वळणाजवळ अपघात झाल्यामुळे कार दरीत कोसळली. या दुर्घटनेत नोएडात राहणारे खारेश दुग्गल आणि त्यांची पत्नी रितू दुग्गल हे दोघे किरकोळ जखमी झाले. SDRF च्या टीमने दोघांना वाचवले असून भवाली रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल केले आहे. याआधी आठवड्याच्या सुरुवातीलाच उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात तरसाली - फाटा रस्त्यावर एक ट्रक १०० मीटर खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.