Navi Mumbai Traffic : पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्टला वाहतूक निर्बंध; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्ट रोजी वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. या काळात काही मार्गांवरील वाहतूक एकेरी करण्यात येणार असून, वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.  (Navi mumbai)


15 ऑगस्ट रोजी सानपाडा येथील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे 8 किलोमीटर लांबीची मानवी साखळी आणि सामूहिक 'वंदे मातरम' गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पहाटे 1 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत बेलापूर-वाशी/मुंबई/ठाणे दिशेचा मार्ग मोराज सर्कलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रम सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत होणार असून, किल्ला जंक्शन ते मोराज जंक्शनदरम्यान मानवी साखळी तयार केली जाणार आहे. (Traffic Restrictions)


या कालावधीत वाशी आणि बेलापूरदरम्यान दोन्ही दिशांची वाहतूक एकाच मार्गावरून वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांना उरण फाटा आणि सायन-पनवेल महामार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करता येईल. (Palm Beach Road Traffic)



दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी 'सिटी हेल्थ रन–2026' मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पहाटे 1 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध लागू राहतील. बेलापूरहून वाशी, मुंबई आणि ठाण्याकडे जाणारा मार्ग मोराज सर्कलच्या पुढे बंद करून वाहतूक विरुद्ध दिशेच्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच बेलापूरमधील किल्ला जंक्शन ते एनआरआय जेट्टीकडे जाणारा डीपीएस स्कूलच्या बाजूचा मार्गही बंद राहणार आहे. ( Independence Day Traffic)


वाहतूक व्यवस्थापनासाठी हे निर्बंध तात्पुरते असून, वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत. मोटार वाहन कायदा 1988 मधील संबंधित कलमांनुसार हे वाहतूक आदेश जारी करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात

Road Accident : नैनितालमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यामुळे २० पर्यटक जखमी

नैनिताल : चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेला २४ तास होण्याआधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी

Mantralaya : मंत्रालयातील कॅन्टीनचा 'लूक' बदलणार

- ३ कोटींचा निधी मंजूर; खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासोबत स्वच्छतेवर भर देणार मुंबई : राज्याचे प्रशासकीय

Government Officers : बदलीनंतरही शासकीय घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा भत्ता रोखणार

- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली

Mumbai Goa Highway News : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग; ३१ ऑगस्टपर्यंत चार उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि कोंडीमुक्त

Daryapur Municipal Council : दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

- काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश मुंबई : अमरावती जिल्ह्यातील