तेहरान : समुद्रात अमेरिका आणि इराण यांच्यात एक मोठा लपंडाव सुरू आहे. एका ताज्या अहवालामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. मॉनिटरिंग फर्म ‘टँकरट्रॅकर्सडॉटकॉम’ने दावा केला आहे की इराणचे एक प्रचंड तेलवाहू जहाज अमेरिकन नौदलाच्या कडक नाकेबंदीला चकवा देत बाहेर पडला आहे. हे जहाज आता आशिया-प्रशांत प्रदेशात पोहोचले आहे. या घटनेमुळे अमेरिकेच्या समुद्री सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, समुद्रात दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत.
इम्फाळ : मणिपूरमध्ये इम्फाळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलजवळ बॉम्बस्फोटाची बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
अमेरिकेने इराणला आर्थिक फटका देण्यासाठी त्याच्या तेल व्यापारावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अमेरिकन नौदलाने समुद्रात कडक नाकेबंदी केली आहे. मात्र, या ट्रॅकिंग फर्मच्या अहवालानुसार इराणचे एक विशाल जहाज ही नाकेबंदी भेदण्यात यशस्वी ठरले आहे. हे जहाज लाखो बॅरल कच्चे तेल घेऊन प्रवास करत आहे. या घटनेतून इराण आपले तेल विकण्यासाठी नवीन आणि गुप्त मार्ग शोधत असल्याचे स्पष्ट होते. फर्मच्या माहितीनुसार, या जहाजावर सुमारे १.९ मिलियन बॅरल कच्चे तेल आहे, ज्याची किंमत अंदाजे २२० दशलक्ष डॉलर आहे.हे विशाल जहाज (वेरी लार्ज क्रूड कॅरियर - व्हीएलसीसी) ‘नॅशनल इराणियन टँकर कंपनी’शी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या जहाजाची ओळख “ह्यूज” या नावाने करण्यात आली आहे.
अहवालानुसार, हे जहाज सुमारे दीड आठवड्यापूर्वी श्रीलंकेजवळील समुद्री भागात शेवटचे दिसले होते. सध्या हा तेलवाहू टँकर लोम्बोक सामुद्रधुनीमार्गे रिओ आर्किपेलागो (द्वीपसमूह) दिशेने पुढे जात आहे. १३ एप्रिल रोजी अमेरिकन नौदलाने नाकेबंदी जाहीर केली, तेव्हा हा टँकर इराणच्या जलक्षेत्रात होता. २० मार्च रोजी स्ट्रेट ऑफ मलक्का मार्गे इराणकडे रवाना झाल्यानंतर या जहाजाने आपला ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम (AIS) बंद केला होता, ज्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण झाले.
बीजिंग : चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारिक आणि कूटनीतिक तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने इराणकडून तेल खरेदी केल्याचा आरोप ...
इराणच्या सरकारी माध्यमांनी २९ एप्रिल रोजी दावा केला होता की त्यांच्या किमान ५२ जहाजांनी अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे, अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की नाकेबंदी सुरू झाल्यापासून त्यांनी इराणशी संबंधित सुमारे ४१ जहाजांना परत जाण्यास भाग पाडले आहे. अमेरिकेच्या मते ही नाकेबंदी प्रभावी ठरत असून त्यामुळे इराणला तेल निर्यात करण्यात अडचणी येत आहेत आणि त्याला तेल साठवणे किंवा उत्पादन कमी करणे भाग पडू शकते.
शनिवारी एका वृत्तसंस्थेने काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, अमेरिकेच्या या समुद्री नाकेबंदीमुळे इराणला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभाग ‘पेंटागॉन’च्या अंदाजानुसार, या नाकेबंदीमुळे इराणला सुमारे ४.८ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. भारतीय चलनात हा तोटा सुमारे ४५६ अब्ज रुपये (४५,६०० कोटी रुपये) इतका आहे.




