मुंबई : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग, घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या वतीने एक प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मुंबईतील महापलिकेच्या २४ विभागांपैकी प्रथमच डी विभागाने आपल्या सर्व कामगारांना या कामगार दिनाच्या औचित्य साधून “गुण गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले. भवन्स कॉलेजच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात घनकचरा विभागातील सर्व कामगारांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या परिश्रमाची व सेवाभावाची दखल घेण्यात आली.
रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे ...
एकूण ९४ तास झाली चर्चा, तब्बल १८८ नगरसेवकांनी घेतला सहभाग सभागृहाचे कामकाज थेट प्रक्षेपण केल्यामुळे नगरसेवकांनी वाढला सहभाग विरोधकांनी सभात्याग ...
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच नगरसेवक अजय पाटील, सन्नी सानप, गौरांग जवेरी, संतोष ढाले व स्नेहल तेंडुलकर तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार हे मुंबई शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार असून, त्यांच्या अथक परिश्रमामुळेच शहर स्वच्छ व सुंदर राहते. अशा सन्मान सोहळ्यांमुळे त्यांच्या कार्याला योग्य ती दखल मिळत असून, ते अधिक उत्साहाने आपली सेवा बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला






