-वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेच्या प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी विरोधकांनी हाणून पाडली
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
मुंबई महापालिका सभागृहात आधीच निधी वाटपावरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच गुरुवारी महापालिका सभागृहात सुधार समितीत मंजूर झालेल्या वडाळा येथील गुहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाला प्राधान्याने मंजुरी देण्याचा प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. आणि सभागृहात विरोधकांचे संख्याबळापुढे सत्ताधाऱ्यांचे संख्या बळ केवळ दोननेच अधिक असल्यामुळे हा प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करण्याचा मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्षावरील ही नामुष्की असून सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक वेळेवर सभागृहात उपस्थित राहत नसल्याचे पाहून विरोधकांनी आपला निर्धार पक्का करत एकप्रकारे या प्रस्तावाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धक्का दिला.
मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेतील कार्यकारी अभियंता पदाची अनेक पदे रिक्त असू स्थापत्य शहर समितीच्या बैठकीत या १६५ रिक्त जागी सहायक अभियंत्यांना ...
- पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना प्रवेशबंदी; प्रवास होणार अधिक जलद व सुरक्षित मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करणारा ...
विशेष म्हणजे सभागृहात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक संख्या कमी असल्याचे पाहून सभागृहनेते आणि महापौर यांनी हा प्रस्ताव रात्री अर्थसंकल्पाचे कामकाज संपल्यानंतर घेणे योग्य ठरले असते, परंतु सभागृहनेते आणि महापौर यांच्यातही यामधून समन्वय नसल्याचे दिसून आले आहे.
सुधार समितीमध्ये हा प्रस्ताव आला असताना काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी या ठिकाणाची पाहणी करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती तर शिवसेनेचे अमेय घोले यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यास मागील २० वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या भाडेकरुंना न्याय मिळेल असे सांगत हा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली होती.त्यामुळे सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी हा प्रस्ताव विरोधकांचा विरोध असतानाही मंजुर केला होता आणि तातडीचे कामकाज म्हणून मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवला होता.





