- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा करणाऱ्या गोलंजी टेकडी जलाशयाचे बांधकाम जुने झाले असून ही टाकी तोडून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. सध्या या जलाशयाची साठवण क्षमता ६.७५ दशलक्ष लिटर्स एवढी आहे. ही क्षमता आता नवीन पुनर्बांधणीमध्ये याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स एवढी केली जाणार आहे. (BMC News)
मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत मालाड पश्चिम येथील ...
मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील विविध भागात गोलंजी टेकडी जलाशय मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गोलंजी टेकडी जलाशय हे सन १९६५ मध्ये बांधलेला असुन त्याची पाण्याची साठवण क्षमता ६.७५ दशलक्ष लिटर्स आहे. या जलाशयाचे बांधकाम ६० वर्ष जुना असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने स्ट्रक्चरल ऑडीट केले. या स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालात या जलाशयाची पुर्नबांधणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार जलअभियंता विभागाच्यावतीने याची पुनर्बांधणी करण्याकरता निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये जी. आर. कंस्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याकरता विविध करांसह १६.०७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (BMC News)
- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भायखळा नागपाडा येथील ...
जलाशयाच्या बांधकामांत कोणत्या गोष्टींचा असेल अंतर्भाव :
-विद्यमान जलाशयाचा एक कप्पा तोडणे -जलाशयाच्या एका कप्प्याचे बांधकाम करणे. -बांधकाम जलरोधक प्रक्रिया करणे. - जलाशयाच्या आतील भागाला निर्विष खाद्य दर्जाचे रंगकाम करणे. -जलाशयाच्या बाहेरील भिंती, जिना व कठडे इत्यादींना बाहेरून रंगकाम करणे. -आगमन व निर्गमन पाईपांचा पुरवठा, स्थापना व जोडणी विद्यमान जाळयाशी करणे. - स्कोर वॉल्य, बटरफ्लाय वॉल्य, स्लुइस वॉल्व काढून टाकणे आणि यांत्रिकी व विद्युत संबंधित अनुषंगिक कामे करणे. - स्लुइस वॉल्व, बटरफ्लाय वॉल्व बसविणे चाचणी करणे आणि कार्यान्वित करणे व यांत्रिकी व विद्युत संबंधित कप्प्याचे अनुषंगिक कामे करणे. -नव्याने बांधलेल्या कप्प्याची हायड्रॉलिक चाचणी करणे. - पहिल्या कप्प्याप्रमाणेच दुसरा कप्पा तोडून पुनर्बाधणी करणे. -जलाशयाच्या परिघावर आणि रस्त्यालगत पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम करणे आणि विद्यमान चेंबरशी त्याची जोडणी करणे. -बाह्य जिन्याचे बांधकाम करणे. - रस्त्याची दुरुस्ती व अनुषंगिक कामे करणे. (BMC News)




