- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी
- पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु करण्याची केली मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मालाड पश्चिममधील नेमाणी शालेय इमारत ही धोकादायक झाली असून या शाळेतील स्लॅब काही दिवसांपूर्वी शिक्षकाच्या अंगावर पडले होते. त्यामुळे भविष्यात या शाळेत अन्य कुठली दुघर्टना घडली जावी अशी प्रशासनाची इच्छा आहे का असा संतप्त सवाल करत भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी ही शाळा बंद करून या शाळेतील मुलांना नव्याने बांधण्यात आलेल्या लिबर्टी गार्डन येथील शालेय इमारतींमध्ये स्थलांतरीत करावे अशी मागणी शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली.
मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ...
मात्र, ही शाळा तोडल्यानंतर या शाळेच्या विद्यार्थ्यांना लांब पर्यायी शाळेत पाठवण्याची गरज भासणार नाही. आपल्या शिक्षण विभागाच्यावतीने लिबर्टी गार्डन येथील शालेय इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले. या शालेय इमारतीत नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करताना त्याठिकाणी नेमाणी शाळेतील मुलांसाठी वर्ग उपलब्ध होती. ही लिबर्टी गार्डन शाळा आणि नेमाणी शाळा यामध्ये जास्त अंतर नसून अर्धा किलोमीटरच्या अंतरावरच या शाळा असून नेमाणी शाळेतील मुलांच्या पालकांची तसेच विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यामुळे भविष्यात नेमाणी शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेवून ही अतिधोकादायक झालेली शाळा त्वरीत बंद करून लिबर्टी गार्डन येथील शाळेमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली. यावर शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी याची विस्तृत माहिती घेवून योग्य ती कार्यवाही होत नाही तोवर हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात येत असल्याचे निर्देश प्रशासनाला दिले.






