ILS Law College : पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयाला दणका

 बेकायदा शुल्क व्याजासह परत करण्याचे आदेश; चौकशी समितीच्या अहवालानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची कारवाई


मुंबई : पुणे येथील नामांकित आय.एल.एस. विधी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या वसूल केलेले शुल्क ६ टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात महाविद्यालयाने नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला.



पुणे येथील या अशासकीय अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्क आकारणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, उच्च शिक्षण विभागाने सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने केलेल्या सखोल चौकशीतून महाविद्यालयाचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे.



चौकशी अहवालानुसार, महाविद्यालयाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०१ (७) मधील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कोणतीही पूर्वमान्यता न घेता शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२४-२५ दरम्यान विद्यार्थ्यांकडून अनधिकृत शुल्क वसूल करण्यात आले. यामध्ये १७ विविध शीर्षकांखाली एकूण १ लाख ४ हजार ८६३ रुपये इतकी रक्कम बेकायदेशीररित्या गोळा केल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, राज्यातील इतर महाविद्यालयांमध्येही अशा प्रकारे अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्यास त्याची तातडीने शहानिशा करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय सहसंचालकांना देण्यात आले आहेत.



कठोर कारवाई करणार


विद्यार्थी हिताला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या दिनांकाला शुल्क भरले आहे, त्या दिवसापासून ६ टक्के व्याजदराने ही रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्याचे स्पष्ट आदेश विभागीय सहसंचालकांनी दिले आहेत. महाविद्यालयांच्या शुल्क निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. - चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Comments
Add Comment

Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये

FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परि

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई

BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु https://prahaar.in/2026/08/14/46-trees-affected-by-the-redevelopment-of-ramabai-and-kamraj-nagar-in-ghatkopar-mmrda-to-plant-955-trees/ मुंबई (विशेष

MMRDA : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरच्या पुनर्विकासात ४६ झाडे बाधित; एमएमआरडीएकडून ९५५ झाडे लावून घेतली जाणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरमधील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी हाती घेण्यात