White House Dinner Firing : वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमधील गोळीबाराने खळबळ; मोदींसह जगभरातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये कॉरेस्पॉन्डेंट्स डिनर दरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने जग हादरले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा, कॅनडाचे पंतप्रधान यासह अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देत या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी :


पंतप्रधान मोदी म्हणाले की, वॉशिंग्टन डीसीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या सुरक्षा घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्यांच्या पत्नी आणि उपराष्ट्राध्यक्ष सुरक्षित असल्याचे समजून दिलासा वाटला असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या उत्तम आरोग्य आणि सुरक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात त्यांनी असेही म्हटले की, कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत हिंसेला स्थान नसते आणि अशा घटनांचा कठोर शब्दांत निषेध केला गेला पाहिजे.



मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शीनबॉम :


मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शीनबॉम यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, “अलीकडील घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समजून आनंद झाला. आम्ही त्यांना आदरपूर्वक शुभेच्छा पाठवतो. हिंसा कधीही कोणताही मार्ग असू शकत नाही.” तर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी, आपल्या देश आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प आणि कार्यक्रमातील इतर सर्वजण सुरक्षित असल्याचे समजून दिलासा वाटल्याचे म्हटले. त्यांनी एक्सवर लिहिले, “कोणत्याही लोकशाहीत राजकीय हिंसेला स्थान नाही. या धक्कादायक घटनेमुळे व्यथित झालेल्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत.”



न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी :


न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “राजकीय हिंसा अजिबात स्वीकारार्ह नाही.” तर सिनेटर मार्क केली यांनी एक्सवर लिहिले की, “राष्ट्राध्यक्ष आणि कॉरेस्पॉन्डेंट्सया डिनरमध्ये उपस्थित इतर सर्वजण सुरक्षित आहेत, तसेच कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी तातडीने कारवाई केली याबद्दल मी कृतज्ञ आहे.”



कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम :


कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी निवेदनात म्हटले, “प्राथमिक अहवालांनुसार, आज रात्री व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डेंट्स डिनरमध्ये उपस्थित सर्वजण सुरक्षित असल्याचे समजून मला दिलासा वाटला. स्वतंत्र प्रसारमाध्यमे ही आपल्या देशाची पायाभरणी आहेत. हिंसा कधीही स्वीकारार्ह असू शकत नाही.”



पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ :


पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, ही घटना अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी असून त्यामुळे ते हादरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी आणि कार्यक्रमात उपस्थित इतर सर्वजण सुरक्षित असल्याचे समजून दिलासा वाटला. या घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. तसेच ट्रम्प यांच्या सातत्यपूर्ण सुरक्षा आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.



दरम्यान ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊस संवाददाता डिनर सुरू होते.त्याचदरम्यान एक व्यक्ती शस्त्रे आणि चाकू घेऊन हॉटेलच्या लॉबीत शिरला आणि बॉलरूमकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला, जिथे मोठ्या संख्येने अमेरिकन नेते आणि पत्रकार उपस्थित होते. संशयित व्यक्तीने पुढे जाण्याचा प्रयत्न करताच तैनात सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.


घटनेनंतर तातडीने सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात आला आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमस्थळ रिकामे करण्यात आले आणि सुरक्षा यंत्रणांनी परिसर ताब्यात घेतला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्वजण सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,