White House Dinner Firing : व्हाईट हाऊस डिनरदरम्यान खळबळ! गोळीबाराच्या वृत्तानंतर ट्रम्प दाम्पत्य तातडीने बाहेर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांना व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनरदरम्यान अचानक बाहेर काढण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली.


मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम सुरू असतानाच बाहेरून गोळीबार झाल्याचे वृत्त पसरले. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प दाम्पत्याला त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यामुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.



घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसराला तात्काळ वेढा घालत तपास सुरू केला आहे. गोळीबाराची नेमकी कारणे आणि हल्लेखोरांविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सध्या तरी मिळालेली नाही.





या घटनेमुळे अमेरिकेतील उच्चस्तरीय कार्यक्रमांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून तपासाची गती वाढवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

Donald Trump : ट्रम्प प्रशासनाकडून इराणला मदत करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर निर्बंध

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

US Immigration News : अमेरिकेत मोठा भूकंप! ट्रम्प सरकारचा दणका, 2 लाख परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे B1 आणि B2 व्हिसा रद्द करण्याच्या तयारीत

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

Hindu family murdered in Bangladesh : बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांची हत्या; याबा सेवनाला विरोध केल्याचा पोलिसांचा दावा, दोन्ही आरोपींचा कबुलीजबाब

रंगपूर : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. माचुआपारा