Sunday, April 26, 2026

White House Dinner Firing : ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी केला हल्ला, हल्लेखोराने दिली कबुली

White House Dinner Firing : ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी केला हल्ला, हल्लेखोराने दिली कबुली

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे ‘व्हाईट हाऊस कॉरस्पाँडंट्स डिनर’मध्ये गोळीबार झाला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने केलेल्या हालचालींमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स हे सुरक्षित आहेत. या प्रकरणात कोल टॉमस ॲलन नावाच्या ३१ वर्षांच्या एका हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. हा हल्लेखोर मूळचा कॅलिफोर्निया प्रांतातील रहिवासी असल्याचे ट्रम्प प्रशासनाने सांगितले. अटकेतील हल्लेखोराने ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी हल्ला केल्याची कबुली दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

हल्लेखोर नोंदणीकृत डेमोक्रॅट आहे. त्याने कमला हॅरिस यांना निवडणूक प्रचारासाठी २०२४ मध्ये देणगी दिल्याचे वृत्त आहे. कॅलटेकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या या हल्लेखोराने डॉमिन्गेझ हिल्स येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्री घेतली होती. त्याने नासा रिसर्च फेलोशिप पण मिळवली होती. लॉस एंजेलिस काउंटीचा “टीचर ऑफ द मंथ” हा पुरस्कार पण त्याने जिंकला होता. पण ट्रम्प प्रशासनाच्या काही निर्णयांमुळे कोल टॉमस ॲलन प्रचंड नाराज होता. ट्रम्प यांच्या प्रशासनातील अधिकारी घेत असलेल्या निर्णयांमुळे अमेरिकेची घडी विस्कटत आहे. परिस्थिती बिघडत आहे. हे थांबवण्यासाठी ट्रम्प प्रशासनालाच दणका देण्याची आवश्यकता असल्याचे ठाम मत कोल टॉमस ॲलनचे झाले होते. यामुळेच त्याने हल्ला केल्याची कबुली दिली आहे. कोल टॉमस ॲलन विरोधात कायदेशीर करणार असल्याचे ट्रम्प प्रशासने सांगितले.

‘व्हाईट हाऊस कॉरस्पाँडंट्स डिनर’मध्ये झालेल्या गोळीबाराचा इराणशी संबंध नाही. अमेरिकेतल्या एका विकृत व्यक्तीने गोळीबार केला होता आणि तो विकृत आता अटकेत आहे, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. लवकरच या संदर्भात सविस्तर माहिती देऊ, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा