दहावीच्या सुट्टीत काय करायचं ?

- आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू


दहावीची परीक्षा झाली आहे. आता फुलटाइम मस्ती, मोबाईल, मित्र आणि झोप हा तुमचा प्लॅन असूच शकतो. गेले वर्षभर क्षणाचीही उसंत न घेता अविरतपणे झपाटल्यासारखे अभ्यास करत होतात तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. एवढी मेहनत घेतली तर तुम्ही तुमच्या मनासारखं जगणं नक्कीच डीझर्व करता. पण खूप काळ विश्रांती घेतल्यानंतर तुम्हाला जे रिकामंपण जाणवणार आहे, जो कंटाळा येतोय त्याचं करायचं तरी काय असा प्रश्न मनात येणारच. व्हिडीओ गेम्स, रिल्स, चॅट आणि बाकी सारंही करून करून किती वेळ करणार? मध्येच रिझल्टची आठवण येऊन पोटात फुलपाखरे उडणारच.
मग हीच नेमकी ती वेळ आहे जेव्हा तुम्ही यातील काही वेळ तुमच्या स्वतःच्या पुढच्या वाटचालीसाठी देता येईल का याचा विचार करा मुलांनो. कारण नंतरच्या कॉलेजच्या धावपळीत असं निवांतपणे विचार करायला वेळ मिळणं थोडं कठीण जाणार आहे.


एक लक्षात ठेवा की, तुम्ही आता मोठे होत आहात म्हणून फक्त शैक्षणिक प्रगती पुरेशी होत नाही. एज्युकेशनल क्वालिफिकेशनबरोबरच तुम्हाला करिअरच्या पुढच्या दृष्टिकोनातून प्रोफेशनल स्किल्स आणि या खुल्या जगामध्ये वावरताना लाइफ स्किल्स यांची नितांत गरज भासणार आहे. त्या दृष्टीने निदान कोणते सोर्सेस आहेत, ज्यातून अशा प्रकारची स्किल्स ग्रहण करायला आणि विकसित करायला कोणत्या संधी आहेत ते तुम्ही तपासू शकता, तसेच तुमचा माईंडसेट तयार करण्याच्या दृष्टीनेही विचार करू शकता. १० वीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तुम्हा विद्यार्थ्यांना थोडा मोकळा वेळ मिळतो. हा वेळ फक्त विश्रांतीसाठीच नाही, तर आपल्या भविष्यासाठी उपयोगी असतो. नवीन गोष्टी शिकण्यासाठीही खूप महत्त्वाचा असतो. योग्य प्रकारे हा वेळ वापरला, तर तुम्हाला तुमच्या करिअरची दिशा मिळू शकते आणि जीवनातील महत्त्वाच्या कौशल्यांचाही विकास होऊ शकतो.


सर्वप्रथम चक्क एक कागद आणि पेन घ्या. एक यादी तयार करा ज्यातून तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करू शकाल. मला काय आवडतं? मी कोणत्या गोष्टीत चांगला/चांगली आहे? हे लिहून काढा आणि समजून घ्या कारण ते खूप गरजेचं आहे. काहींना विज्ञान आवडतं, काहींना कला, तर काहींना व्यवसाय क्षेत्र. यासाठी इंटरनेटवर छोट्या छोट्या अभियोग्यता चाचण्या देऊन पाहू शकता किंवा शिक्षक व पालकांशी चर्चा करू शकता.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे नवीन कौशल्यं शिकणं. आजच्या काळात फक्त पुस्तकातील ज्ञान पुरेसं नाही. कोडींगची सुरुवातही करू शकता. युट्यूब किंवा फ्री ऑनलाइन कोर्सेसच्या मदतीने हे सहज शक्य आहे.


तिसरं म्हणजे संवाद कौशल्य :


इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये नीट बोलता येणं खूप महत्त्वाचं आहे. दररोज थोडं इंग्रजी वाचणं, बातम्या ऐकणं किंवा आरशासमोर बोलण्याचा सराव करणं यामुळे आत्मविश्वास वाढतो. मित्रांसोबत चर्चाही करा.


चौथं म्हणजे वाचनाची सवय लावा. चांगली पुस्तकं वाचल्याने ज्ञान वाढतं आणि विचार करण्याची क्षमता सुधारते. आत्मचरित्रं, प्रेरणादायी कथा, विज्ञानाशी संबंधित पुस्तकं वाचल्यास जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.


पाचवं म्हणजे वेळेचं नियोजन टाईम मॅनेजमेंट शिकणं. रोजचे एक छोटे टाईम टेबल तयार करा. त्यात अभ्यास, खेळ, वाचन आणि विश्रांती यासाठी वेळ ठेवा. हे कौशल्य पुढच्या आयुष्यात खूप उपयोगी पडतं.


सहावं म्हणजे लहान लहान प्रोजेक्ट्स करा. उदाहरणार्थ, एखादा science experiment, छोटा व्यवसाय (जसे हाताने वस्तू बनवून विकणे) किंवा बागकाम. यामुळे सृजनशीलता वाढते आणि प्रॅक्टिकल नॉलेज मिळते.


सातवं म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. दररोज व्यायाम करा, योगा करा किंवा खेळा. मोबाईलचा वापर कमी करा. मेडिटेशन केल्याने मन शांत राहतं आणि लक्ष केंद्रित होतं.


आठवं म्हणजे सामाजिक कामात भाग घ्या. आपल्या परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण किंवा गरजूंना मदत करणं अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. यामुळे समाजाबद्दलची जाणीव वाढते आणि आपल्यात चांगले गुण विकसित होतात.


नववं म्हणजे वेगवेगळ्या करिअर पर्यायांबद्दल माहिती घ्या. डॉक्टर, इंजिनीअर, सीए, कलाकार, िडझायनर, उद्योजक अशा विविध क्षेत्रांबद्दल जाणून घ्या. युट्यूब व्हिडीओ पाहून किंवा मोठ्यांशी बोलून माहिती मिळवा. त्यामुळे ११ वीला कोणती शाखा निवडायची याचा निर्णय सोपा होईल.


आजच्या डिजिटल काळात मोबाईल फक्त मनोरंजनासाठी नाही, तर शिकण्यासाठी उत्तम साधन आहे. जर योग्य गोष्टी पाहिल्या तर तुमचं आयुष्य
बदलू शकतं.उदा. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त टेड टॉक्स टेड टॉक्स म्हणजे छोटे पण खूप प्रभावी व्हिडीओज असतात, ज्यात जगातील तज्ज्ञ लोक त्यांचे अनुभव आणि कल्पना शेअर करतात. हे व्हिडीओ साधारण १०-१८ मिनिटांचे असतात आणि खूप प्रेरणा देणारे असतात.


तुम्ही खालील टेड टॉक्स नक्की पाहा:
१. “Inside the Mind of a Master Procrastinator” – Tim Urban - वेळ वाया घालवण्याची सवय कशी कमी करावी हे समजते.
- अभ्यासात लक्ष कसं द्यायचं यासाठी खूप उपयुक्त.
२. “Do Schools Kill Creativity?” – Sir Ken Robinson
- आपली कलात्मकता कशी वाढवायची हे शिकवते.
- फक्त मार्क्स नाही तर स्कील्स महत्त्वाच्या आहेत हे समजते.
३. “The Power of Introverts” – Susan Cain
- शांत विद्यार्थ्यांनाही मोठं यश मिळू शकतं हे दाखवते.
४. “What Makes a Good Life?” – Robert Waldinger
- आयुष्यात यश म्हणजे फक्त पैसा नाही, तर relationships पण महत्त्वाच्या आहेत.
- असे टेड टॉक्स विद्यार्थ्यांना नवीन विचार देतात आणि प्रेरणा देतात.
University of the People
टेड-एड (छोटे शिकवणारे व्हिडीओ)
- टेड-एड हा टेड चा शैक्षणिक भाग आहे.
- येथे ५-१० मिनिटांचे animated videos असतात.
यामुळे काय फायदे होतात मुलांनो, तर सोप्या भाषेत अवघड विषय समजतात. science, psychology, life skills सगळं शिकता येतं. quiz आणि discussion questions मिळतात.
- रोज १ व्हिडीओ पाहिला तरी तुमचं ज्ञान खूप वाढेल. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वेबसाईट
१. कोर्सेरा जगातील मोठ्या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस उपलब्ध आहेत.
- स्किल डेव्हलपमेंटसाठी खूप उपयोगी
उदाहरण : कोडिंग, िबझनेस, संवाद कौशल्ये
२. Codecademy - कोडिंग शिकायचं असेल तर best platform
नवगतासाठी खूप सोपे
३. EdX - Harvard, MIT सारख्या universities चे कोर्सेस.
-करिअरसाठी उपयुक्त ज्ञान.
४. यु ट्यूब :- फ्री लर्निंगसाठी सर्वात मोठा प्लॅटफॉर्म
✔ काय शिकता येईल? इंग्रजीत बोलणे, संवाद कौशल्ये, बिझनेस आयडिया, प्रेरणा योग्य चॅनेल निवडलेत, तर यु ट्यूब म्हणजे “free school” आहे.
न्यूज विक
विद्यार्थ्यांसाठी छोटा प्लॅन
तुम्ही सुट्टीत हा साधा रुटीन फॉलो करू शकता:
दररोज १ टेड टॉक
१स्कील व्हिडिओ (यू ट्यूब)
१ तास नवीन स्कील प्रॅक्टीस
३० मिनिटे वाचन
मुलांनो उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे फक्त आराम नाही, तर स्वतःला अपग्रेड करण्याची संधी आहे.


शेवटी, स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी खास असतं. इतरांशी तुलना करू नका. आपलं ध्येय ठरवा आणि त्यासाठी मेहनत करा. उन्हाळ्याची सुट्टी ही फक्त वेळ घालवण्याची नाही, तर स्वतःला घडवण्याची संधी आहे. या वेळेत शिकलेली कौशल्यं आणि घेतलेले अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतात. त्यामुळे या सुट्टीचा योग्य उपयोग करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा.

Comments
Add Comment

माधवी कुंटे आणि स्नेहलताबाई

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड विश्वकोशाची अध्यक्ष झाले तेव्हा काहींनी मजवर टीका केली. पण माधवी कुंटे, स्नेहलता

दृष्टिकोन

- जीवनगंध; पूनम राणे ई... आई... ज्यूस प्यायचा आहे मला. घे ना गं, आई... “हो, हो, राजा, घेऊया आपण ज्यूस...” “अगं सपना... किती

हरिपूजा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भगवान श्री विष्णू हे जगाचे पालन कर्ताच नव्हे, तर निर्माताही आहेत. सर्व

न जाणो, कोणता श्वास अखेरचा ठरेल! : नूतन

स्मृती पटल : अनिल तोरणे कर्करोगासारख्या असाध्य आजाराचं नाव ऐकून रुग्ण तर हतबल होतोच शिवाय त्याच्या

भाषेत विज्ञानभाषा सजवताना...

व्याख्याने, चर्चासत्रे, वार्षिक संमेलन, परिसंवाद, वैज्ञानिक गप्पा, मुलाखती अशा अंगाने सुरू झालेल्या मराठी

पुस्तकांचं भावविश्व

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर पुस्तकांची आणि माझी पहिली ओळख झाली ती शाळेची पायरी चढल्यावर. हातात आलेलं पहिलं