मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग कल्याण – कसारा स्थानकांदरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामानिमित्त खर्डी यार्डच्या पुनर्बांधणीसाठी उंबरमाळी आणि आटगाव स्थानकांदरम्यान नॉन-इंटरलॉकिंग कामकाजाकरिता २५ आणि २६ एप्रिल दरम्यान रात्री १२ ते मध्यरात्री ३ या वेळेत विशेष ब्लॉक घेणार आहे.
ब्लॉक विभाग: उंबरमाळी (वगळून) ते आटगाव (वगळून) अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर
उपनगरीय रेल्वेच्या कामकाजावर होणारे परिणाम
ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. ब्लॉक कालावधीत कसाराकडे जाणाऱ्या उपनगरीय सेवा आसनगाव / टिटवाळा स्थानकांवरच थांबतील किंवा तेथूनच सुरू होतील.
उपनगरीय सेवा रद्द
२५ एप्रिल रोजी दुपारी १४:४२ वाजता कसारा येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची उपनगरी ट्रेन रद्द राहील.
उपनगरीय गाड्यांची सेवा - शॉर्ट टर्मिनेट
* २५ एप्रिल रोजी सकाळी ०९:३४ ते २१.३२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा उपनगरी ट्रेन आसनगाव येथेच शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील. * २५ एप्रिल रोजी दुपारी १३.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- आसनगाव उपनगरी ट्रेन, सायंकाळी १८.२८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कसारा उपनगरी ट्रेन आणि २६ एप्रिल रोजी मध्यरात्री ००.०८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा उपनगरी ट्रेन टिटवाळा येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. * २५ एप्रिल रोजी रात्री २२:४७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कसारा उपनगरी ट्रेन वासिंद येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
उपनगरीय गाड्यांचे - शॉर्ट ओरीजनेट
* २५ एप्रिल रोजी ११.४७ ते २२.३६ या वेळेत कसारा येथून सुटणाऱ्या कसारा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी ट्रेन आसनगाव येथून पर्यायी स्थानक सुरू होईल.
* २५ एप्रिल रोजी रोजी १७.१४ आणि २१.१२ वाजता कसारा येथून सुटणारी कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल टिटवाळा येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
शेवटची आणि पहिली लोकल
* डाउन ईशान्य (नॉर्थ-ईस्ट) मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसारासाठी ब्लॉक सुरू होण्यापूर्वीची शेवटची उपनगरी ट्रेन- २५ एप्रिल रोजी सकाळी ०८:३३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा उपनगरी ट्रेन. * अप ईशान्य मार्गावर कसारा येथून २५ एप्रिल रोजी सकाळी १०:१८ वाजता सुटणारी कसारा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही उपनगरी ट्रेन ब्लॉक सुरू होण्यापूर्वीची शेवटची ट्रेन असेल. * डाउन ईशान्य मार्गावर २६ एप्रिल रोजी कसारासाठी सुटणारी ब्लॉकनंतरची पहिली उपनगरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०४:१९ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा असेल. * अप ईशान्य मार्गावर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतरची पहिली लोकल कसारा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल असेल, जी २६ एप्रिल रोजी सकाळी ०३:५१ वाजता कसारा येथून सुटेल.
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या कामकाजावर होणारे परिणाम
मेल/एक्सप्रेस गाड्यांचे रद्दीकरण:
* गाडी क्र. 11011/11012 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- धुळे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रस्थान २५ एप्रिल २०२६ )
मेल/एक्सप्रेस गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन
* गाडी क्र. 17611 हुजूर साहेब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रस्थान २४ एप्रिल २०२६) मनमाड स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. * गाडी क्र. 17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस (प्रस्थान २५ एप्रिल २०२६) मनमाड स्थानक येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे मार्गांतर (डायव्हर्जन)
* गाडी क्र. 04151 कानपूर सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष आणि गाडी क्र. 22537 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रस्थान २४ एप्रिल २०२६) यांचे मार्गांतर या मार्गाने केले जाईल. जळगाव- नंदुरबार- वसई रोड- ठाणे मार्ग. * गाडी क्रमांक 01074 बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष आणि गाडी क्रमांक11062 जयनगर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रस्थान २४ एप्रिल २०२६) मनमाड- पुणे- लोणावळा - कल्याण मार्गे वळवण्यात येईल.
डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे मार्गांतर
* गाडी क्र. 01143 लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर विशेष आणि गाडी क्र.11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बल्हारशाह एक्स्प्रेस (प्रस्थान २५ एप्रिल २०२६) कल्याण - कर्जत - पुणे - मनमाड मार्गाने वळवण्यात येईल. * गाडी क्र. 12627 एर्नाकुलम – हजरत निझमुद्दीन मंगला सुपरफास्ट एक्स्प्रेस (प्रस्थान २४ एप्रिल २०२६) पनवेल -वसई रोड -सुरत - जळगाव मार्गाने वळवण्यात येईल. कल्याण येथील थांबा वगळण्यात येईल आणि त्याऐवजी भिवंडी रोड येथे अतिरिक्त थांबा देण्यात येईल. * गाडी क्र. 12137 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- फिरोजपूर कँट पंजाब मेल (प्रस्थान २५ एप्रिल २०२६) ठाणे -वसई रोड- नंदुरबार- जळगाव मार्गे वळवली जाईल. * गाडी क्र. 12131 दादर – साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (प्रस्थान २५ एप्रिल २०२६) कल्याण- कर्जत - पुणे - साईनगर शिर्डी मार्गे वळवली जाईल. * गाडी क्र. 17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेस (प्रस्थान २५ एप्रिल २०२६) कल्याण - कर्जत - लोणावळा- पुणे - मनमाड मार्गे वळवली जाईल.
खालील गाडी प्रस्थान दिनांक २४ एप्रिल २०२६ चे वेळापत्रक खालीलप्रमाणे बदलण्यात येईल:
* गाडी क्र. 01080 गोरखपूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष, गोरखपूर येथून २५ एप्रिल २०२६ रोजी १९:३० वाजता सुटेल.
खालील गाडी प्रस्थान दिनांक २५ एप्रिल २०२६ चे वेळापत्रक खालीलप्रमाणे बदलण्यात येईल:
* गाडी क्र. 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमृतसर एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी ०१:०० वाजता सुटेल. (नियोजित सुटण्याची वेळ २५ एप्रिल २०२६ रोजी २३:३०) * गाडी क्र. 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -हावडा मेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २६ एप्रिल २०२६ रोजी ०१:२५ वाजता सुटेल. (२५ एप्रिल २०२६ रोजी २१:१० वाजता सुटण्याची वेळ) * गाडी क्र. 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २६ एप्रिल २०२६ ०१:४० वाजता. (२५ एप्रिल २०२६ रोजी २२:३० वाजता सुटण्याची वेळ) * गाडी क्र. 12322 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावा कोलकाता मेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २६ एप्रिल २०२६ ०३:०० वाजता. (२५ एप्रिल २०२६ रोजी २२:१५ वाजता सुटण्याची वेळ) * गाडी क्र. 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालिमार एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २६ एप्रिल २०२६ रोजी ०१:२५ वाजता. (२५ एप्रिल २०२६ रोजी २२:०० वाजता सुटण्याची वेळ) * गाडी क्र. 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस सुपर फास्ट, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २६ एप्रिल २०२६ रोजी ०१:४५ वाजता सुटणार. (२५ एप्रिल २०२६ रोजी २२:४५ वाजता सुटण्याची वेळ) * गाडी क्र. 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २६ एप्रिल २०२६ रोजी ०२:०० वाजता सुटणार. (२५ एप्रिल २०२६ रोजी २३:३५ वाजता सुटण्याची वेळ) * गाडी क्र. 04152 लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २६ एप्रिल २०२६ रोजी ०४:३० वाजता सुटणार. (नियोजित सुटण्याची वेळ: २५ एप्रिल २०२६ रोजी १७:१५) * गाडी क्र. 00111 भिवंडी रोड – एसजीटीवाय/संक्राईल गुड्स टर्मिनल मालगाडी, भिवंडी येथून सुटण्याची वेळ: २६ एप्रिल २०२६ रोजी ०३:०० वाजता. (नियोजित सुटण्याची वेळ: २५ एप्रिल २०२६ २२:३०)
खालील गाड्यांचे २६ एप्रिल २०२६ रोजीचे प्रस्थान दिनांक वेळापत्रक खालीलप्रमाणे बदलण्यात येईल:
* गाडी क्र. 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- वाराणसी महानगरी एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याची वेळ: २६ एप्रिल २०२६ रोजी ०१:१० वाजता. (नियोजित सुटण्याची वेळ: २६ एप्रिल २०२६ रोजी ००:१०) * गाडी क्र. 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस – हाटिया सुपर फास्ट एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटण्याची वेळ: २६ एप्रिल २०२६ रोजी ०१:३५. (नियोजित सुटण्याची वेळ: २६ एप्रिल २०२६ रोजी ००:१५) * गाडी क्र. 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस - कुशीनगर सुपर फास्ट, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटण्याची वेळ: २६ एप्रिल २०२६ रोजी ०२:१५. (नियोजित सुटण्याची वेळ: २६ एप्रिल २०२६ रोजी ००:३५)
अप मेल/एक्सप्रेसचे नियमन
* गाडी क्र. 01026 बलिया -दादर विशेष (प्रस्थान दिनांक २४ एप्रिल २०२६) कसारा येथे ०१:४० तास नियमित केली जाईल * गाडी क्र. 18030 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रस्थान दिनांक २४ एप्रिल २०२६) इगतपुरी येथे ४० मिनिटांनी नियमित केली जाईल * गाडी क्र. 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल (प्रस्थान दिनांक २४ एप्रिल २०२६) इगतपुरी येथे ३० मिनिटांनी नियमित केली जाईल * गाडी क्र. 01139 नागपूर- मडगाव विशेष (प्रस्थान दिनांक २५ एप्रिल २०२६) आणि गाडी क्र. 20104 आझमगड - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस (प्रस्थान दिनांक २४ एप्रिल २०२६) नियमित केल्या जातील.
भुसावळ विभागात १५ ते ३० मिनिटांनी उशीर.
टीप
विभागात गाड्यांचे नियमन व एकामागोमाग लागण्यामुळे खालील अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांना विलंब होऊ शकतो. * 11002 बल्हारशाह - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस * 12152 शालिमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस * 12112 अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस * 12106 गोंदिया - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस आणि * 17058 लिंगमपल्ली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस
उशिरा धावणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या किंवा नंतरच्या तारखेला घोषित केलेल्या गाड्यांचे नियमन देखील परिचालनाच्या सोयीनुसार केले जाईल.
नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना २५ ते ३० मिनिटांचा विलंब होईल.






