Navnath Ban PC : उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न

मुंबई : विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच आणि एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू आहे. विधान परिषदेची जागा उबाठाला हवी असेल तर राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी लागेल, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर गेले तर वर्षभरानंतर राज्यसभा निवडणुकीत आपला पत्ता कट होऊ शकतो म्हणून आपल्या खासदारकीची चिंता लागलेले संजय राऊत हे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असल्याचा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


माझी मागणी आहे की संजय राऊत यांना काँग्रेस रत्न पुरस्कार देण्यात यावा. कारण राहुल गांधीही काँग्रेसची बाजू मांडत नाहीत त्यापेक्षा जास्त चांगली बाजू संजय राऊत मांडतात. काँग्रेसची गुलामी करण्याचे काम संजय राऊत यांच्याकडून सुरू आहे. मीठ उद्धव ठाकरे यांचे खायचे आणि चाकरी काँग्रेसची करायची हा संजय राऊत यांचा धंदा झाला आहे. संजय राऊत यांचे प्रगल्भ नेतृत्व मिळाल्यामुळे बुडणाऱ्या काँग्रेसला थोडे अच्छे दिन येतील, अशी टीका बन यांनी केली.


नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने उबाठा गट, काँग्रेसने त्याला विरोध केला. महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री का झाली नाही ? देशात भाजपाने महिला पंतप्रधान का केले नाही हे विचारण्याआधी संजय राऊत यांना मला विचारायचे आहे की २०१९ साली उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री का केले नाही ? संजय राऊत, तुम्हाला एवढी चिंता असेल तर पक्षप्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव घोषित न करता रश्मी ठाकरे यांचे नाव तुम्ही नाव घोषित करणार आहात का ? त्यासाठी आग्रह धरणार आहात का ? अशा प्रश्नांची सरबत्ती बन यांनी केली.


तुम्ही सातत्याने महिलांचा अपमान करण्याचे काम केले तर भाजपा महिलांचा सन्मान करते, असे सांगून बन पुढे म्हणाले, काल स्वप्ना पाटकर यांनी एक ट्वीट केले ते संजय राऊत तुम्ही ध्यानात घ्या. तुमच्या कच्च्याबच्च्यांकडून, तुमच्या टोळीकडून ताईंना धमकावण्याचा प्रयत्न होतो आहे. त्या पुस्तक लिहित असल्याने त्यांना धमकी देऊन ते पुस्तक समोर येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहात. मी कालच पाटकर यांच्याशी बोललो. महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या सरकारमध्ये कुठल्याही बहिणीला त्रास होणार नाही. धमक्यांना भीक घातली जाणार नाही, हे लक्षात ठेवा; असा इशारा बन यांनी संजय राऊत यांना दिला.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी