डोनाल्ड ट्रम्प यांची भारतविरोधी संतापजनक पोस्ट, म्हणाले, ते मुलं जन्माला घालतात अन्…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी इराणसोबत युद्ध सुरू करून संपूर्ण जगालाच एकप्रकारे संकटात टाकले आहे. अमेरिकेचे युद्ध जरी एकट्या इराणसोबत सध्या सुरु असले तरी त्याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अनेक देशांमध्ये महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. इंधनाअभावी अनेक देशांमध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. त्यातही डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील ? आणि कधी काय करतील याचा काही नेम नाही.


काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र आता त्यांनी एक पोस्ट करुन पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये भारताविरोधातील चुकीच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. एकीकडे भारताला जुना मित्र म्हणायचे तर दुसरीकडे भारताविरोधा आग ओकायची ही स्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची नेहमीचीच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि चीन यांच्याबद्दलची एकदम खालच्या स्तरावरील सोशल मिडिया पोस्ट रिपोस्ट केली.


ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर कट्टरपंथी अमेरिकन लेखक आणि समालोचक माइकल सॅवेज यांच्या एका जुन्या व्हिडिओतील मजकूर पोस्ट केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट रिपोस्ट केल्याने एकच खळबळ उडालीय. भारताबद्दल या पोस्टमध्ये आपत्तीजनक शब्द वापरण्यात आले आहे. रेडिओ होस्ट मायकल सेवेज याने ही पोस्ट शेअर केली, जी डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपोस्ट केली. हेच नाही तर भारताला या पोस्टमध्ये नरकाचा दरवाजा म्हणण्यात आले. सेवेज याने या पोस्टमध्ये दावा केला की, आशियाई देशातील नागरिक अमेरिकेत येतात आणि 9 महिन्यात बाळाला जन्म घालतात. यापद्धतीने ते 9 महिन्याचे बाळ थेट अमेरिकन नागरिक ( Citizenship )होते. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात फायदा उचलला जात आहे ज्यामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे.


ते बाळ तात्काळ अमेरिकन नागरिक ( Citizenship )बनते. मग त्याचे कुटुंब भारत किंवा चीनमधून अमेरिकेत येते. हे देश जगाचे नरकाचा दरवाजा आहेत. हीच पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रिपोस्ट करण्यात आली. हेच नाही तर यादरम्यान सेवेज याने लॅपटॉप गॅंगस्टर अशा शब्दांचाही यावेळी वापर केला. अमेरिकेच्या ध्वजाच्या या लोकांनी अपमान केल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच आशियातून अमेरिकेत दाखल झालेले कुटुंब अमेरिकेचे नुकसान करत आहेत. विशेष म्हणजे मूळ अमेरिकी नागरिकांचेही असेही या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.


विशेष म्हणजे, ज्या व्हिडिओला केवळ १२ हजार व्ह्यूज होते, त्यातील मजकूर ट्रम्प ( Donald Trump)  यांनी अक्षरश: ४ पानांमध्ये लिहून आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. राष्ट्राध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीने अशा वांशिक आणि द्वेषपूर्ण विधानांना प्रसिद्धी दिल्याने, त्यांनी एकप्रकारे या विचारांवर आपली मोहोर उमटवली असल्याचे मानले जात आहे. सॅवेज यांनी आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले की, सध्या अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांमध्ये देशाबद्दल कोणतीही निष्ठा उरलेली नाही आणि अनेक ठिकाणी आता इंग्रजीही बोलली जात नाही.


दरम्यान, या व्हिडिओमध्ये, विशेषतः भारतीय आणि भरती प्रक्रियेबाबतचे दावे, हे वादग्रस्त असून ते कोणत्याही सिद्ध पुराव्यांऐवजी केवळ राजकीय मतेच प्रतिबिंबित करतात, असे सांगितले जाते. भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे दावे करणाऱ्या ट्रम्प यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे जागतिक स्तरावर, विशेषतः भारतीय समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Pakistan Suicide Bombing: पाकिस्तानमध्ये शांतता रॅलीवर आत्मघाती बॉम्बहल्ला; 14 जणांचा मृत्यू, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

Pakistan Suicide Bombing : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात रविवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात किमान 14 जणांचा

Indonesia Ferry Boat Accident : इंडोनेशिया समुद्रात भीषण दुर्घटना! प्रवासी फेरी बोटला आग लागून 5 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

जकार्ता : इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ रविवारी (2 ऑगस्ट) एक मोठी सागरी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या एका

Iran - America War : इराणविरोधात ट्रम्प यांचा मोठा डाव? अमेरिकन लष्कराला नव्या कारवाईचे आदेश; मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढला

वॉशिंग्टन : अमेरिका (America)आणि इराण (Iran) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड

Pakistan Coal Mine Blast : बलुचिस्तान हादरलं! कोळसा खाणीतील स्फोटात ३२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

क्वेटा : पाकिस्तानातील बलुचिस्तान (Balochistan) प्रांताची राजधानी क्वेटा (Quetta) शहराजवळील एका कोळसा (Coal) खाणीत भीषण स्फोट (Blast)

Hamas : ट्रम्प यांची मोठी घोषणा! हमासच्या पूर्ण निःशस्त्रीकरणानंतर गाझातून इस्रायली सैन्य माघारी

गाझा (Gaza) संघर्ष संपवण्याच्या दिशेने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हमास (Hamas) आणि इस्रायल (Israel) यांच्यात व्यापक

Spain Migration : स्पेनच्या स्यूटा सीमेजवळ हजारोंची घुसखोरी; समुद्रातून प्रवेशाच्या प्रयत्नांत १८ जणांचा मृत्यू

स्पेन : स्पेन (Spain) आणि मोरोक्को (Morocco) यांच्या सीमेलगत असलेल्या स्यूटा (Ceuta) या स्पेनच्या स्वायत्त शहरात मोठे स्थलांतर